Breaking News

उर्फी जावेद व्हायरल व्हिडीओमुळे आली अडचणीत उर्फी जावेदने अटकेच्या भीतीने काढला देशातून पळ

उर्फी जावेद हिने मुंबई पोलिसांची बदनामी केल्या संदर्भात झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.मात्र, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, उर्फीनं केवळ मुंबईतूनच नाहीतर चक्क देशातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळत आहे.

गुन्हा दाखल होताच, उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेली. दरम्यान, या प्रकरणातील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून स्वस्त प्रसिद्धीसाठी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.उर्फीचा व्हिडीओ व्हायरल प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी उर्फी जावेदसह ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करताच उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेल्याची माहिती मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी पोलिसांची स्कार्पिओ गाडी ओशिवरा पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतली आहे. उर्फी जावेद काल (शुक्रवारी) सकाळी अंधेरी पश्चिमेत लोखंडवाला बॅक साईड रोडवर एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पित होती. तेवढ्यात तिथे दोन महिला पोलिसांनी शॉर्ट कपडे घातल्यामुळे उर्फीला ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस गाडी घेऊन दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पोलिस अधिकारी दिसत होते, मात्र ते खोटे पोलीस असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची बदनामी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणांमध्ये काल संध्याकाळी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी पोलिसांची गाडी ओशिवरा पोलिसांनी जप्त केली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शिल्पाचा पती अखेर अडीज वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिसला विना मास्क राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा म्हणाला की,

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला होता. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *