Breaking News

अभिनेत्री ने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

आतापर्यंत अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्या आहेत. ही चित्रपट सृष्टीतील एक काळीबाजू आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. आता बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल डॉ. अदिती गोवित्रीकर ही कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.अदितीने हिंदी चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये ठसा उमटवला. पण सिनेइंडस्ट्रीत आलेल्या एका भयंकर अनुभवामुळं तिनं बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

कास्टिंग काऊचवर बोलताना आदितीने सांगितले की, तिचे नेहमीच डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते, तिला अभिनेत्री किंवा मॉडेल व्हायचं नव्हते. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं होतं. एक काळ असा होता की, मला मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट वाटू लागला. मी खूप वर्षे मॉडेलिंग केलं. पण तरीही माझा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मी आजवर काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं. मी माझं काम करत होते, पण मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. त्यामुळं मी या क्षेत्रातून काढता पाय घेतला, असं अदितीनं सांगितलं.

दिती म्हणाली,”मला एका मोठ्या सिनेमाची ऑफर आली होती, पण त्यासाठी माझ्याकडे नको त्या गोष्टीची मागणी करण्यात आली होती, मी तेव्हा ती ऑफर स्वीकारली असती, कॉम्प्रमाइज करावं लागलं असतं आणि आज मी टॉपच्या ए-लिस्टर अभिनेत्रींच्या यादीत असते. या घटनेनंतर तिला धक्का बसला मात्र तिने घेतलेला निर्णय योग्य होता असे ती म्हणते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शिल्पाचा पती अखेर अडीज वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिसला विना मास्क राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा म्हणाला की,

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला होता. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *