अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत तिचा ड्रामा काही थांबवायचं नाव घेत नाही. राखी सावंत तिच्या अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध नाही तितकी ती तिच्या ड्रामेबाज सवयीमुळे प्रसिद्ध आहे.कधी रिअलिटी शोमुळे, तर कधी लग्नामुळे तर कधी इतर कॉन्ट्रोव्हर्सीमुळे राखी सांवत सातत्यानं चर्चेत असते. अनेकदा राखी ही बिगबॉस हिंदी मध्ये सुद्धा चमकली असून मागच्या वर्षीच्या बिगबॉस मराठी मध्ये तिने अक्षरश गोंधळ घातला होता.
सध्या ती तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. राखी सावंत ही अशी अभिनेत्री आहे जिनं फार गरबीची दिवस पाहिले आहे आणि खूप श्रीमंती देखील पाहिली आहे. राखी सोशल मीडियावर तिच्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तर दुसरीकडे नवरा आदिल खान विरोधात काही व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. अशातच राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती ‘ज्या गोष्टी आपल्याला देव देत नाही त्या डॉक्टर देतात’, असं म्हणताना दिसत आहे. राखी सावंत हे नेमकं कशाबद्दल म्हणतेय?
‘राखी का स्वयंवर’ या शो पासून राखी सावंत चर्चेत आहे. त्याआधी तिनं काही म्युझिक अल्बम्समध्ये काम केलं होतं. राखी का स्वयंवरनंतर राखीनं अनेकांना मुलाखतीत दिल्या होत्या. त्यातीलच तिच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राखी सावंत कॉफी विथ करणच्या एका सीझनमध्ये आली होती. तेव्हा ती करणसमोर जे काही बोलून गेली त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
तसेच तिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणते, ‘माझा चेहरा आधी चांगला नव्हता’. त्यावर करण तिला ‘त्यासाठी तू काही केलंस? खूप मेहनत घेतलीस तुझ्या बॉडीवर?, असं विचारतो. ‘हो माझी बॉडीही तेव्हा फार छान नव्हती. ती माझ्या शरिरावर खूप मेहतन घेतली’, असं सांगते.