Breaking News

ज्येष्ठ रेडिओ स्टार निवेदक अमिन सायानी यांचा आवाज आता कायमचा थांबला

“भाईओ और बेहनो आप सबका …” असा गोड आणि हवाहवासा वाटणारा ज्येष्ठ निवेदक अमिन सायानी यांचा अखेर कायमचा शांत झाला. अमिन सायानी यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने मुबंईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात काल संध्याकाळी २० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच संध्याकाळी ७ च्या सुमारास प्राणज्योत मालवली असल्याची माहिती अमिन सायानी यांचे मित्र राजील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दिलीप-देव आणि राज अर्थात दिलीप कुमार, देव आनंद, आणि राज कपूर यांच्या स्टारडमची चलती होती. त्या काळात ऑल इंडिया रेडियोच्या सिलोन आकाशवाणी केंद्रांवर १९५२ ते १९८८ या काळात भारतीय रेडिओ श्रोत्यांवर भाईओ आणि बेहनो, मै आपका दोस्त अमिन सायानी बोल रहा हूँ या आवाजने समस्त श्रोत्यांवर मोहिनी घातली. त्यानंतर विविध भारती या वाहिनीवर बिना का गीतमाला हा कार्यक्रम १९८८ साली सुरु करण्यात आला. त्यानंतर रेडिओ श्रोत्यांच्यावर अमिन सायानी यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने अक्षरशः मोहिनी घातली.

विशेष म्हणजे दिलीप-देव आणि राज अर्थात दिलीप कुमार, देव आनंद, आणि राज कपूर यांच्या स्टारडमची चलती होती. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या वलयातही आपल्या आवाजाने श्रोत्यांमध्ये वेगळे स्थान निर्माण करण्यात अमिन सायानी यशस्वी ठरले. त्यामुळेच आज त्यांच्या शैलीतच आताचे एफएम रेडिओचे अनेक रेडिओ जॉकी त्यांच्याच शैलीची कॉपी करताना आढळून येतात.

त्याचबरोबर अमिन सायानी यांनी त्यांच्या आवाजाच्या जादूगीरीने बिना का गीतमाला हा रेडिओवरील हिंदी गीतांचा कार्यक्रम इतका लोकप्रिय केला की पुढील अनेक वर्षे त्यांचा कार्यक्रम इतर दूरदर्शन वाहिन्यांपेक्षाही सर्वाधिक टॉपवर राहिला आणि त्याची लोकप्रियताही शेवटपर्यंत टीकवून ठेवली. त्यांच्या आवाजा इतकी लोकप्रियता आणि प्रसिध्दी रेडिओवरील कोणत्याही निवेदक किंवा रेडिओ जॉकीला आतापर्यंत मिळवता आली नाही.

Check Also

टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक

सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *