Breaking News

Aamir Khan : अमिर खान व विष्णू विशाल अडकले चेन्नईच्या पुरात

Aamir Khan  : अभिनेता अमित खान आणि विष्णू विशाल तामिळनाडूच्या चेन्नईत आलेल्या पुरात अडकले होते. मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे हे दोन्ही अभिनेते अडकून पडले होते. अग्निशमन आणि बचाव विभागाने 24 तासांनंतर या दोघांना बाहेर काढले. विष्णू विशालने सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली.

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश भाग पाण्यात बुडाले आहेत. घरांमध्ये पाणी तुंबल्याने लोकांना येणे-जाणे तर अवघड झाले आहेच, शिवाय त्यांचे जगणेही कठीण झाले आहे. सरकारकडून लोकांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमिर खानची आई झीनत हुसैन यांच्यावर चेन्नईत उपचार सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो चेन्नईत वास्तव्याला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईत रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक वस्त्या जलमग्न झाल्या आहेत. शहरात राबवण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अग्निशमन आणि बचाव पथकाने पुरात अडकेले अमिर खान आणि अभिनेता विष्णू विशाल अडकून पडले होते. रेस्क्यू टीमने या दोघांची सुखरूप सुटका केली. विष्णूने ट्विट करत सोशल मिडीयात दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये आमिर खान बोटीवर बसलेला दिसत आहे. दरम्यान, विष्णू विशालचे काही नवीन फोटोही समोर आले आहेत. यामध्ये तो रेस्क्यू टीमच्या लोकांसोबत राफ्टमध्ये बसला आहे. या फोटोंमध्ये त्याच्यासोबत आमिर खानही आहे. Aamir Khan

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘टाइगर ३’च्या रिलीजआधी सलमान खानने चाहत्यांना केली विनंती

‘टाइगर ३’ च्या रिलीजला आता काही तास उरले आहेत. सलमान खानचा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *