Breaking News

सारा प्रथम बोलली शुभम गिल सोबत असलेल्या नात्यावर

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या नवीन भागात स्टार किड्स हजेरी लावतच असतात. त्यात नुकताच सारा अली खान आणि अनन्या पांडे यांचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोची चर्चा होण्याचे कारण म्हणजे यामध्ये शुबमन गिलबद्दल सारा अली बोलताना दिसली. भारताचा स्टार क्रिकेटर शुबमन गिल हा सध्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे.

काही दिवसांपासून तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या डेटिंगमुळे चर्चेत होता. कधी सारा अली खान तर कधी सारा तेंडुलकरबरोबर त्याचे नाव जोडले गेले. पण, शुबमन कोणत्या साराला डेट करत होता, यावर त्याने अद्याप काहीच बोलणे केलेले नाही. मात्र सारा खानसोबतचे त्याचे पह्टो व्हायरल झाल्यामुळे शुबमन आणि साराच्या डेटिंगच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र आता शुबमनसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर साराने ‘कॉफी विथ करण’मध्ये मौन सोडले आहे.

नव्या प्रोमोमध्ये करणने साराला शुबमनसोबतच्या डेटिंगबाबत छेडले. त्यावेळी ती म्हणते, ‘तुम्ही चुकीच्या साराला पकडले आहे. सारा का सारा दुनिया गलत सारा के पिछे पडा है.’ साराच्या या भाष्याने शुबमनला ती डेट करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या दोघांना एका रेस्टोरंट मधून बाहेर पडत असल्याचे फोटो समोर आल्यानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डेट करत असल्याच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सुशांत बरोबर असलेल्या नात्यावर प्रथमच बोलली अंकिता सुशांत च्या आठवणीत भरून आले अंकिताचे डोळे

सुशांत राजपूत याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात सामील झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *