Breaking News

प्राजक्ता माळीला अमिताभ बच्चन यांनी केला व्हिडीओ काॅल प्राजक्ता माळीच्या मोबाईलवर चाहते अमिताभ बच्चन यांचा कॉल

प्राजक्ता माळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्राजक्ता माळी ही नुकताच कौन बनेगा करोडपती शोच्या १५ व्या सीजनमध्ये झळकलीये. विशेष म्हणजे प्राजक्ता माळी हिला चक्क अमिताभ बच्चन यांनीच व्हिडीओ काॅल केला. त्याचे झाले असे की, मराठमोळा अजय नावाचा मुलगा हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कौन बनेगा करोडपती १५ च्या सीजनला थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉसीटवर बसला. यावेळी तो अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे काैतुक करताना दिसला.

सतत अजय याच्या तोंडामध्ये प्राजक्ता माळी हिचे नाव होते. मग काय शेवटी थेट अमिताभ बच्चन यांनीच प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ काॅल केला. यावेळी प्राजक्ता माळी ही अजय याला थेट म्हणते की, तू जिंक अजय मी स्वत: तुला भेटायला येईल. आम्ही सर्वजण तुझ्या पाठींशी आहोत. यावेळी प्राजक्ता माळी ही अमिताभ बच्चन यांचे देखील धन्यवाद मानताना दिसतंय.

प्राजक्ता माळी ही अमिताभ बच्चन यांना म्हणते की, सर, खरोखरच आज हे जाणून खूप जास्त छान वाटले की, तुम्ही आमचा कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा बघता. या व्हिडीओ काॅलमध्ये बऱ्याच वेळा प्राजक्ता माळी ही थेट मराठी बोलताना देखील दिसली. प्राजक्ता माळी थेट म्हणाली की, मला वाटते की, सातत्याने नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.

Check Also

टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक

सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *