Breaking News

श्रेयस तळपदेच्या या चित्रपटात माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी करणार काम

अभिनेता श्रेयस तळपदेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटात अल्लू अर्जूनला श्रेयसने हिंदी आवाज दिला. त्यावेळी त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. त्यानंतर आता श्रेयस पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे.

श्रेयसचा ‘अजाग्रत’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात माजी मुख्यमंत्री यांची पत्नी, कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त ‘अजाग्रत’मध्ये अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज आणि मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार आहेत.

या चित्रपटाची ‘अंधारामागील सावल्या’ अशी टॅगलाईन आहे. या चित्रपटाचे कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार आहे. हा चित्रपट हिंदीसह सात विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘अजाग्रत’ हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची ओळख लवकरच समोर येणार आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढेल. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणारा आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक

आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *