Breaking News

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली होती. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. पण, काही काळानंतर हे नवरा बायको सगळं विसरून एकमेकांवर प्रेम करताना दिसायचे. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये जोरदार भांडण झालं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘ वृत्तमाध्यमांच्या x वर अंकिता आणि विकीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ते दोघेही भांडताना दिसत आहेत. अंकिता विकीवर रागवल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या भांडणामध्ये अंकिताने विकीला लाथ मारल्याचंही व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. “तू स्वार्थी आणि मुर्ख आहेस. तुझ्याबरोबर राहून माझं डोकं फिरलं आहे.

आपलं लग्न झालंय हे विसरून जा. आजपासून तू आणि मी वेगळे आहोत. तू पहिल्यापासून असाच होतास. तू माझा वापर केला आहेस,” असं अंकिता विकीला म्हणते. या व्हिडिओमुळे अंकिता-विकीच्या नात्यात फूट पडली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पहिल्या दिवसापासूनच विकीने ‘बिग बॉस’च्या घरात त्याचा खेळ खेळायला सुरुवात केली होती. ‘बिग बॉस’च्या घरातील इतर सदस्यांबरोबर तो मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करताना दिसला. विकी या घरात टिकून राहण्यासाठी छक्के पंजे करत असल्याचंही शोमध्ये पाहायला मिळत आहे.

Check Also

टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक

सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *