Breaking News

या पाच राज्यातील इंधनाच्या किमतीत वाढ महाराष्ट्रासहीत ५ राज्यात इंधन महागलं; गुजरातमध्ये मात्र स्वस्त

कच्च्या तेलाच्या भावात अंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास डब्यू टीआय क्रूड ७८.४८ डॉलर्स प्रति बॅरलला उपलब्ध होतं. तर ब्रेंट क्रूड ऑइल ८२. ५२ डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं आहे. देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. भारतामध्ये रोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर जारी केलं जातात. जून २०१७ च्या आधी दर १५ दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केला जायचा.

महाराष्ट्रामध्ये पेट्रोल ७९ पैशांनी तर डिझेल ७६ पैसे प्रति लिटरने महाग झालं आहे. बिहारमध्ये पेट्रोलचे दर२ ५२ तर डिझेचे दर ४८ पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. या शिवाय हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आणि तामिळनाडूमध्येही पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे गुजरामध्ये पेट्रोल ३८ पैसे प्रति लिटर आणि डिझेल ४१ पैसे प्रति लिटरने स्वस्त झालं आहे. हरियाणामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९. ७६ रुपये प्रति लीटरला आहे.तर मुंबईमध्ये पेट्रोल १०६. ३१ रुपये आणि डिझेल ९४. २७ रुपये प्रति लीटरला आहे. तर कोलकात्यामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लीटरला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६५ रुपये आणि डिझेल ९४.२५ रुपये प्रति लीटरला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *