Breaking News

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा?

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. विशेषत: डान्स करताना आणि जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हे अचानक आलेले हार्ट अटॅक हा सायलेंट हार्ट अटॅकचा प्रकार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये, रुग्णांमध्ये हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत, परंतु शरीरातील हृदयाची कार्ये बिघडतात आणि अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तत्काळ उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो.

दरम्यान, हृदयविकाराच्या या घटना अचानक कशा घडत आहेत आणि कोणत्या लोकांना जास्त धोका आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांशी बोललो.याबाबत कार्डिओलॉजिस्ट स्पष्ट करतात की, जबरदस्ती व्यायाम किंवा नृत्य करताना अचानक हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताची गुठळी जमा होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हे सर्व काही मिनिटांत घडते. या काळात रुग्णाला उपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याचा धोका असतो.

तज्ज्ञ पुढे सांगतात की ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आहे किंवा जे जास्त धूम्रपान करतात त्यांना या प्रकारच्या हृदयविकाराचा धोका जास्त असतो. अशा लोकांच्या हृदयाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, ज्यामुळे नंतर हृदयविकाराचा झटका येतो. अनेक प्रकरणांमध्ये, हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात.

दरम्यान हृदयविकाराचा झटका कार्डियाक सीटी स्कॅनच्या मदतीने ओळखला जाऊ शकतो. ही चाचणी ECG पेक्षा खूप चांगली आहे. कारण सायलेंट ब्लॉकेजमध्ये ईसीजी नॉर्मल असू शकतो. अशा परिस्थितीत सायलेंट हार्ट अटॅक ओळखता येत नाही.

 

Check Also

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रूग्णालयातही होमिओपॅथिक विभाग सुरु

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून समितीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *