Breaking News

मोदी सरकारच्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा भाजपाकडून भारत हा विश्वगुरु आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभी रहात असल्याचा प्रचार सुरु केला. तसेच अनेक पाश्चिमात्य देश भारतातील पुराणतील संदर्भाचा वापर करून पुढे जात असल्याचे जाहिरपणे सांगितले जाऊ लागले. तसेच देशाच्या शिक्षण पध्दतीत बदल करून रोजगारक्षम देणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने नवी राष्ट्रीय शिक्षण पध्दतीचा धोरण मसुदा आणण्यात आला. मात्र या धोरणाची अंमलबजावणी अद्याप राष्ट्रीयस्तरावर काही झाली नाही. परंतु देशातील अनेक विद्यार्थी भारतात राहुन उच्च शिक्षण घेण्याऐवजी विशेषतः अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा कल वाढलेला असल्याची धक्कादायक माहिती नुकतेच एका अहवालातून पुढे आली आहे.

मोदी सरकारच्या २०१८-१९ च्या काळात परदेशी उच्च शिक्षणासाठी २ लाख २ हजार १४ भारतीय विद्यार्थी अमेरिकेला गेले. त्यानंतर यंदाच्या वर्षात अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३५ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच जवळपास अमेरिकेतील ७० टक्के विद्यापीठांमध्ये अंडरग्रेड असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाणा वाढण्यामागे भारतातील अमेरिकी दूतावासाकडून त्यांच्या नियमित वेळेपेक्षा जास्त काम व्हिसा वाटपासाठी सुरु केले असून १.४ लाखपेक्षा अधिक व्हिसांचे भारतीयांना वाटप करण्यासाठी काम करत आहे. तसेच मागील २० वर्षात जास्तीत भारतीयांना अमेरिकन व्हिसा देण्यात आलेला आहे.

भारतात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च शिक्षण अमेरिकेत जाऊन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ६३ टक्क्याने वाढ झाली आहे. तर अंडरग्रॅज्युएट १६ टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा हा अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्यासाठी आहे. भारतीय विद्यार्थी अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी जास्तीत जास्त करून ऑपश्नल प्रॅक्टीकल ट्रेनिंग या पर्यायाचा वापरही करत आहेत. या पर्याय निवडीचा वापर ६९ हजार ०६२ भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी केला असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थाचे पुर्नमुल्याकंन आणि शिक्षण विभागाच्या प्रमुख मिर्का मारटेल यांनी दिली.

अमेरिकेत शिक्षणासाठी जाताना प्रामुख्याने STEM अर्थात गणित, काँम्पुटर सायन्स, इंजिनियरींग आणि एमबीए यापैकी एका विषयाची निवड भारतीय विद्यार्थी करतात. तसेच अमेरिकेतही याच विषयांतील शिक्षण पध्दतीचा बोलबाला आहे.

अमेरिकेतील विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर चीन नंतर भारताचा दुसरा नंबर लागत असून चीनने यंदाच्या वर्षी २ लाख ८९ हजार ५२६ विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवून आपले स्थान सर्वात वरचे ठेवले आहे. कोविडच्या आधीच्या आकडेवारीची तपासणी केली असता त्या तुलनेत अमेरिकतील शैक्षणिक विद्यापीठांमध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर २०२२-२३ मध्ये १४ टक्क्याने अर्थात वार्षिक पध्दतीने २ लाख ९८ हजार ५२३ इतके वाढल्याचे दिसून येते.

यावेळी बोलताना मिर्का मारटेल म्हणाले की, मागील काही काळात भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा अमेरिकेत शिक्षण घेण्याकडे वाढला आहे. तसेच शिक्षणानंतर अमेरिकेतच नोकरी करण्याकडेही कल वाढत आहे. वार्षिक सरासरी पाह्यची झाल्यास यात १ टक्क्याने दरवर्षाला वाढ होत आहे. २०२३ च्या सुरुवातीला पदवीव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे सुरुवातीला कमी झाल्याचे वाटत होते. मात्र आता त्यांची संख्या वाढताना दिसत असल्याचे स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत सरासरी पाह्यला गेलं तर जवळपास अमेरिकेत शिक्षणासाठी येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १७ टक्क्याने वाढली असल्याचे दिसून येत आहे. तसेच ओपीटी अर्थात ऑपशनल प्रॅक्टीकल ट्रेनिंग या विभागांतर्गत शिक्षणासाठी येणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचेही मिर्का मारटेल यांनी सांगितले.

तर अमेरिकी दूतावासाच्या व्हिसा कौन्सिलर विभागाच्या प्रभारी व्यपस्थापकिय संचालक आणि विभाग प्रमुख ब्रेंडा ग्रेव्ह यांना विचारले असता ते म्हणाली, बहुसंख्या भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकी विद्यापीठे, कॉलेजांमध्ये शिक्षण घेण्याकडे कल दाखविलेला आहे. मागील वीस वर्षाच्या तुलनेत यावर्षी १ लाख ४० हजार भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व्हिसा देण्यात आल्याचे सांगितले.

वर्ष                                           विद्यार्थ्यांना व्हिसा
२०१४-१५                                 १ लाख ३२ हजार
२०१५-१६                                 १ लाख ६५ हजार
२०१६-१७                                 १ लाख ८६ हजार
२०१७-१८                                 १ लाख ९६ हजार
२०१८-१९                                  २ लाख ०२ हजार
२०१९-२०                                  १ लाख ९३ हजार
२०२०-२१                                   १ लाख ६७ हजार
२०२१-२२                                    १ लाख ९९ हजार
२०२२-२३                                    २ लाख ६८ हजार

ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्यांची संख्या
२०२२-२३                             २०२१-२२
अंडर ग्रॅज्युएट                       ३१,९५४                               २७,५४५
ग्रॅज्युएट                                 १.६५ लाख                           १.०२ लाख
ओपीटी                                  ६९,०६२                               ६८ हजार १८८
(ऑपशनल प्रॅक्टीकल ट्रेनिंग)
डिग्री नसलेले                            १,९७१                                     १,३७८

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अखेर भारताने युनोत केले इस्त्रायलच्या विरोधात मतदान

इस्त्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत हमासला नेस्तानाभूत करायचे म्हणून पॅलिस्टीनी नागरिकांवर हल्ले करत त्यांना हुसकावून लावत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *