Breaking News

Tag Archives: education

ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन सहकार्य वाढविणार

ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली. पॉल मर्फी यांनी गुरुवारी (२१ मार्च) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा …

Read More »

शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा अंगीकार करा

राज्य पायाभूत शैक्षणिक आराखडा तयार करताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमामुळे बालकांवर अतिरिक्त भार न येता त्यांना जे ज्ञान मिळणे गरजेचे आहे, ते सुद्धा दिले गेले पाहिजे, अशा पद्धतीने अभ्यासक्रम बनविण्यात यावा. सर्वंकष अभ्यासक्रम तयार करण्यासाठी शैक्षणिक आराखड्यामध्ये सर्व शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून सर्वोत्तम …

Read More »

मोदी सरकारच्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा भाजपाकडून भारत हा विश्वगुरु आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभी रहात असल्याचा प्रचार सुरु केला. तसेच अनेक पाश्चिमात्य देश भारतातील पुराणतील संदर्भाचा वापर करून पुढे जात असल्याचे जाहिरपणे सांगितले जाऊ लागले. तसेच देशाच्या शिक्षण पध्दतीत बदल करून रोजगारक्षम देणारी शिक्षण …

Read More »

दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक असून, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. राज्य मंडळाने काही दिवसांपूर्वी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची माहिती, आदिवासी, आदिम जमातीच्या लोकांना घरे, रोजगार, शिक्षणासाठी कृती आराखडा वनविभागाची जमिन किंवा प्रसंगी राज्य सरकार जमिन खरेदी करणार

आदिवासी समाजामध्ये आदिम जमातींचे मागासलेपण अधिक आहे. त्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची जमीन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल, अथवा विशेष योजना करून जमीन खरेदी करून त्यावर घर तयार करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना देखील मिळणार मोफत गणवेशासोबत बूट, पायमोजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या पहिली ते आठवीत शिकणाऱ्या शालेय मुलांना देखील मोफत गणवेश देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मोफत गणवेशसोबतच दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे देण्यात येतील. या निर्णयामुळे मागास व दारिद्रय रेषेखाली विद्यार्थ्यांप्रमाणेच दारिद्र्य रेषेवरील विद्यार्थ्यांना मोफत …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची साद, ज्याचं बोट धरून … तर संपल आमचं राजकारण उद्यापासून महाराष्ट्रात तीव्र आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते आज …

Read More »

प्रकल्प संचालक कैलास पगारे यांची तंबी, प्रशिक्षकांना वेळेवर मानधन अदा करा अन्यथा… व्यवसाय प्रशिक्षण संस्थांवर दिला कारवाईचा इशारा

राज्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत व्यवसाय प्रशिक्षक नियुक्त केले जातात. त्यांना वेळेवर मानधन अदा न केल्यास, अशा संस्थांविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रकल्प संचालक कैलास पगारे म्हणाले, …

Read More »

बाळासाहेब थोरात यांची मागणी, कमी पटसंख्येच्या शाळांबाबत धोरण स्पष्ट करा दुर्गम आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय ?

युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला आहे. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, उर्वरित जागांसाठीही पदभरती प्रक्रिया राबविणार

प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून २ हजार ८८ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबची रोस्टर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही  आढावा घेऊन टप्याटप्यांनी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल. या भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील पुढे …

Read More »