Breaking News

Tag Archives: अमेरिका

भारताचा सर्वाधिक व्यापार चीनसोबत आयात $१०१.७ तर निर्यात १६ अब्जची

आर्थिक थिंक टँक GTRI च्या आकडेवारीनुसार, चीन २०२३-२४ मध्ये $११८.४ अब्ज द्वि-मार्गी वाणिज्यसह भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे, यापूर्वी सर्वाधिक व्यापार अमेरिकेसोबत होत होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार २०२३-२४ मध्ये $११८.३ अब्ज होता. २०२१-२२ आणि २०२२-२३ दरम्यान वॉशिंग्टन हा नवी दिल्लीचा सर्वोच्च व्यापार भागीदार …

Read More »

भारताने अमेरिकेचा धार्मिक आयोगाचा अहवाल फेटाळला

भारताने गुरुवारी यूएस सरकारच्या आयोगाने – आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील आयोग (यूएससीआयआरएफ) – धार्मिक स्वातंत्र्यावर जारी केलेल्या अहवालाचे निष्कर्ष नाकारून म्हटले आहे की ती “राजकीय अजेंडा असलेली पक्षपाती संस्था” आहे. भारताचे वैविध्यपूर्ण, बहुलवादी आणि लोकशाही आचारसंहिता समजून घेण्यासाठी यूएस सरकारच्या आयोगाची गरज नसल्याचे मत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या खुलाशात नमूद केले. …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र नाराजी, अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल हा पक्षपाती

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की यूएस स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेला मानवी हक्क अहवाल “खूप पक्षपाती” आहे आणि केंद्र सरकार “त्याला कोणतेही महत्व देत नाही” अशा तीव्र शब्दात भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली नाराजी अमेरिकेला कळविली आहे. मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाचा उद्रेक झाल्यानंतर मणिपूरमधील “महत्त्वपूर्ण” गैरवर्तन, बीबीसीवर कर अधिकाऱ्यांनी …

Read More »

मोदी सरकारच्या काळात शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा भाजपाकडून भारत हा विश्वगुरु आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभी रहात असल्याचा प्रचार सुरु केला. तसेच अनेक पाश्चिमात्य देश भारतातील पुराणतील संदर्भाचा वापर करून पुढे जात असल्याचे जाहिरपणे सांगितले जाऊ लागले. तसेच देशाच्या शिक्षण पध्दतीत बदल करून रोजगारक्षम देणारी शिक्षण …

Read More »

२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार

हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. …

Read More »

मध्य पूर्वेतील युध्द आणि चीन, युक्रेनची अमेरिकेविरोधात वाढणारी भीती अमेरिकेचा युक्रेन आणि इस्त्रायलला पाठिंबा पण भविष्यातील भूमिकेवरून साशंक

मध्य पूर्वेतील हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बीडेन यांनी घेतला. तसेच इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांची भेट घेऊन अमेरिकेकडून मदत देण्याचे आश्वासनही दिले. त्यातच अमेरिकेने रशियाचा विरोधक युक्रेन आणि चीनचा विरोधक तैवानला शस्त्रात्रांची मदत देण्यास सुरुवात केल्याने आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी या देशांनी …

Read More »

कॅनडा-अमेरिका- भारतः पितळ उघडे पाडण्यासाठी यंत्रणा लागल्या कामाला लवकरच तपास यंत्रणांची बैठक

एका कॅनेडियन नागरिकांचा मात्र भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या आंतरराष्ट्रीय भारतीय गुप्तचर संस्थेने केल्याचा आरोप कॅनडाने केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानेही कॅनडा हा देश दहशतवाद्यांचा अड्डा बनला असल्याचा प्रत्यारोप केला. या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा मधील संबधांमध्ये थोडीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकांच्या …

Read More »

भारतीयांच्यादृष्टीने अभिमानाचा क्षणः अमेरिकेतील जगप्रसिध्द ब्रॉड-वे ला डॉ आंबेडकर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शेअर केला व्हिडिओ

अमेरिकेतील न्युयॉर्क येथील ब्रॉड-वे हा जगप्रसिध्द परिसर, या परिसर आणि या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक, कलाकार यांचा वावर सातत्याने होत असतो. तसेच अनेक कलावंत आणि साहित्यिकांना या या भागात कार्यक्रमही करायचा असतो. खरं पाह्यचं झालं ब्रॉडवेचे एक वेगळेच आकर्षण कलाप्रेमीकांच्या जगतात आहे. आता या ब्रॉड-वेला जाणाऱ्या रस्त्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, …

Read More »