Breaking News

मध्य पूर्वेतील युध्द आणि चीन, युक्रेनची अमेरिकेविरोधात वाढणारी भीती अमेरिकेचा युक्रेन आणि इस्त्रायलला पाठिंबा पण भविष्यातील भूमिकेवरून साशंक

मध्य पूर्वेतील हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बीडेन यांनी घेतला. तसेच इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांची भेट घेऊन अमेरिकेकडून मदत देण्याचे आश्वासनही दिले. त्यातच अमेरिकेने रशियाचा विरोधक युक्रेन आणि चीनचा विरोधक तैवानला शस्त्रात्रांची मदत देण्यास सुरुवात केल्याने आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी या देशांनी मागणी नोंदविल्याने अमेरिकेच्या भूमिकेवरून युक्रेन आणि चीन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

रशियाच्या विरोधात लढण्यासाठी लागणाऱे प्रमुख शस्त्रास्त्र अमेरिकेकडून युक्रेनला पुरविण्यात येतात. तर हमासच्या विरोधात लढण्यासाठी इस्त्रायललाही अमेरिकेकडील शस्त्रांस्त्रांची गरज लागते. सध्या अमेरिकेच्या बीडेन सरकारकडून या या मित्र राष्ट्रांना मदत केली जात आहे. मात्र २०२४ च्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रॅम्प हे पुन्हा निवडणूकीत विजयी होण्याची वातावरण निर्मिती झालेली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि चीनचे समर्थक असून मध्य पूर्वेतील इतर मुस्लिम राष्ट्रांच्या विरोधातही त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे.

त्यामुळे उद्या बीडेन सरकार जाऊन जर डोनाल्ड ट्रम्प सरकार अमेरिकेत सत्तेवर आल्यास युक्रेन आणि इस्त्रायलला करण्यात येणारा शस्त्रास्त्र पुरवठा करण्याच्या भूमिकेत बदल घडू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पेंटागॉन कडून मात्र युध्दासाठी लागणाऱ्या शस्त्रांस्त्रांच्या निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून हा शस्त्रास्त्र साठा युक्रेन आणि इस्त्रायललाही पुरविण्यात येत आहे. त्यातच अमेरिका आणि चीनमधील शीत युध्द काही केल्या कमी व्हायला तयार नाही.
तसेच मागील काही दिवसात अमेरिकेच्या खर्चिक बाजूमुळे येथील अर्थव्यवस्था चांगलीच गोत्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फेडरल बँकेने मोठ्या प्रमाणावर व्याज आकारणी सुरु केली आहे. परिणामी येथील कर्जावरील व्याजातही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे अमेरिकेचे ज्यो बीडेन सरकार आर्थिक बोज्याखाली आल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री चॉक हेगेल म्हणाले की, सध्या अमेरिककडून संरक्षण विषयक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. तसेच मित्र राष्ट्रांच्या सैन्याला प्रशिक्षण देणे आणि शस्त्रास्त्र देणे यावर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे आर्थिक ताण वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनिश्चित अशा काळात अमेरिकेतील व्यवस्था अकार्यान्वित, आततायीपणा आणि सरकारच्या विभागांची अकार्यक्षमता याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाटत असल्याचे मत व्यक्त केले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *