Breaking News

Tag Archives: इस्त्रायल

इराणच्या राजदूताचे आश्वासन, जहाजावरील भारतीय क्रु मेंबर्संना लवकरच सोडू

इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या इस्रायलशी संबंधित कंटेनर जहाजात बसलेले सर्व १७ भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. जहाजाच्या क्रूला ताब्यात घेतले गेले नाही आणि ते जेव्हा हवे तेव्हा जहाज सोडू शकतात. इराणच्या राजदूताच्या म्हणण्यानुसार पर्शियन आखातातील हवामानाची स्थिती चांगली नाही …

Read More »

इराण-इस्त्रायलच्या युध्द परिस्थितीचा भारतीय बाजारावर होणार परिणाम तेल, सोने आदी वस्तू महाग होण्याची शक्यता

इस्त्रायल हमास दरम्यान सुरु झालेल्या युध्दानंतर आता इस्त्रायल- इराण यांच्यात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच इराणने इस्त्रायलचे जहाज जप्त केल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे. मात्र या युध्दाचा परिणाम भारतातील इक्विटी आणि सराफा बाजारावर पडणार असून भारतातील अनेक वस्तू महागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या …

Read More »

इराणने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय क्रु मेंबरर्स

नुकतेच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या दुतावासाचे नुकसान आणि एका बड्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य चार लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर इस्त्रायलला धडा शिकविण्यासाठी इराणकडून लष्करी प्रत्त्युत्तर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर भारताकडून पुढील ४८ तासात इराण आणि इस्त्रायलचा प्रवास टाळावा अशा भारतीय नागरिकांना देण्यात आला होता. त्यास …

Read More »

परराराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना इशारा, इराण-इस्त्रायलचा प्रवास टाळा

परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करून भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलचा प्रवास टाळण्यास सांगितले आहे. पुढील ४८ तासांत इराण इस्रायलवर थेट हल्ला करणार असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बाब समोर आली आहे. मंत्रालयाने सध्या इराण किंवा इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेथील भारतीय दूतावासांशी संपर्क साधून स्वतःची नोंदणी करण्याचे आवाहन करत …

Read More »

अखेर भारताने युनोत केले इस्त्रायलच्या विरोधात मतदान

इस्त्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत हमासला नेस्तानाभूत करायचे म्हणून पॅलिस्टीनी नागरिकांवर हल्ले करत त्यांना हुसकावून लावत आहे. तसेच गाझा पट्टीत अडकलेल्या आणि इस्त्रायली हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना पुरेसे उपचारही मिळू नये यासाठी गाझातील हॉस्पीटल आणि युनोच्या छावणीत राहणाऱ्या लोकांवरही इस्त्रायलकडून सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर भारताने इस्त्रायलच्या विरोधात युनोने ठेवलेल्या …

Read More »

२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार

हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. …

Read More »

अखेर बेंजामिन नेत्यानाहु यांनी मागितली माफी पत्रकार परिषद घेत मागितली माफी

इस्त्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर जगभरातून आणि इस्त्रायलमधूनही त्यावेळी इस्त्रायलची सेना आणि गुप्तचर संस्था काय करत होती असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी आपल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणा आणि सेना अधिकाऱ्यांवर टीकेची तोफ डागली होती. मात्र आज बेंजामिन नेत्यानाहु यांनी पत्रकार परिषद घेत अखेर आपल्याच देशाच्या सैन्याची आणि …

Read More »

गाझातील मानवी मुल्यांच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भारत युनोत गैरहजर हमास हल्ल्याचा उल्लेख न केल्याने आमसभेत गैरहजर राहिल्याचा दावा

सध्या मध्य पूर्वेत हमास आणि इस्त्रायल दरम्यान उडालेल्या युध्दाच्या भडक्याने आंतराराष्ट्रीयस्तरावर सरळ सरळ दोन तट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या युध्दाच्या मुद्यावरून युनोच्या आमसभेच्या मतदानावेळी भारत सरकार गैरहजर राहिला. भारत सरकारने गैरहजर राहण्याचे समर्थन करताना मानवीदृष्टीकोनातून युध्दबंदीचा प्रस्ताव या सभेत आणण्यात आला नाही. उलट ७ ऑक्टोंबर रोजी हमास …

Read More »

मध्य पूर्वेतील युध्द आणि चीन, युक्रेनची अमेरिकेविरोधात वाढणारी भीती अमेरिकेचा युक्रेन आणि इस्त्रायलला पाठिंबा पण भविष्यातील भूमिकेवरून साशंक

मध्य पूर्वेतील हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बीडेन यांनी घेतला. तसेच इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांची भेट घेऊन अमेरिकेकडून मदत देण्याचे आश्वासनही दिले. त्यातच अमेरिकेने रशियाचा विरोधक युक्रेन आणि चीनचा विरोधक तैवानला शस्त्रात्रांची मदत देण्यास सुरुवात केल्याने आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी या देशांनी …

Read More »

एअर इंडियाने तेल अवीवची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली हमासच्या हल्ल्यानंतर एअर इंडियाचा निर्णय

हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलमधील तेल अवीववर हल्ला केल्यानंतर एअर इंडियाने १४ ऑक्टोबरपर्यंत तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेचा विचार करून एअर इंडियाने तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तेथून १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या …

Read More »