Breaking News

इराण-इस्त्रायलच्या युध्द परिस्थितीचा भारतीय बाजारावर होणार परिणाम तेल, सोने आदी वस्तू महाग होण्याची शक्यता

इस्त्रायल हमास दरम्यान सुरु झालेल्या युध्दानंतर आता इस्त्रायल- इराण यांच्यात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच इराणने इस्त्रायलचे जहाज जप्त केल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे. मात्र या युध्दाचा परिणाम भारतातील इक्विटी आणि सराफा बाजारावर पडणार असून भारतातील अनेक वस्तू महागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या संघर्षाचे परिणाम भारतीय बाजारावर होतील आणि त्यामुळे बाजारातील इराणमधील तेल व्यापारी आणि इस्त्रालयशी संबधित व्यापाऱ्यांकडून गुंतवणूक काढून घेतली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वाढत्या तणावाचा कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. क्रूडमधील प्रत्येक एक डॉलरच्या वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि महागाई वाढण्यास आणखी सुरुवात होईल. युध्दजन्य परिस्थितीमुळे संघर्ष आणखी वाढल्यास देश राजकीय मार्गाने परिस्थिती विस्कळीत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ही परिस्थिती आणखी किती काळ चिघळेल हे पाहणे गरजेचे ठरणार असल्याचे मत वेल्थमिल सिक्युरिटीजच्या इक्विटी स्ट्रॅटेजीच्या संचालक क्रांती बथिनी यांनी व्यक्त केले.

अमेरिकेच्या मार्चच्या महागाई निर्देशांकानंतर या वर्षी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात लक्षणीय कपात करण्याच्या अपेक्षेमुळे भारतातील इक्विटी बाजार आधीच दबावाखाली आहेत. दमास्कसमधील इराणी दूतावास कंपाऊंडवर १ एप्रिल रोजी झालेल्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची लाट सुरू केल्याने हे आणखी वाढू शकते, अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.

इराण आणि इस्त्रायल दरम्याची परिस्थिती आणखी चिघळल्यास “हे वाढवण्याऐवजी “आम्ही आता पूर्ण केले” अशी झाल्यास त्याचा परिणाम कॉर्पोरेट कमाई आणि यूएस फेड आउटलुकवर लक्ष केंद्रित केले जाईल. जर इस्रायलने इराण विरोधातील हल्ले आणखी वाढविल्यास किंवा इराणने इस्त्रायलवर आणखी एक हल्ले केले तर बाजार धोक्यात येऊ शकतो. विशेषतः सोने-चांदी आणि सुरक्षित असलेली चलने तसेच कच्चे तेल वाढतील तर जोखीम संपत्ती विकली जाईल, अशी शक्यताही “अजय बग्गा यांनी आपल्या एक्स X अकाऊंटवरून सांगितले आहे.

जर तेलाच्या किमती पश्चिम आशियाई प्रदेशातील संघर्षाला प्रतिसाद देत असतील तर या आठवड्यात इक्विटी मार्केटमध्ये सुधारणा दिसू शकते. सोमवारी तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. गेल्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती १० टक्क्यांनी वाढून ९० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.

देशांतर्गत रिफायनरसह एका अधिकाऱ्याने सांगितले की, आधीच सीमावादाच्या पार्श्वभूमीवर तणाव, मागणीचा दृष्टीकोन आणि OPEC+ उत्पादन कपातीसह पुरवठ्यातील गतिशीलता यामुळे ब्रेंटच्या रॅलीला $९० प्रति बॅरलने समर्थन दिले. इराणवरील इस्रायलच्या हल्ल्यामुळे किंमत $९२ पेक्षा जास्त झाली, जी ऑक्टोबर २०२३ नंतरची सर्वोच्च आहे.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. इराण-इराक युध्द काळातही असाच तणाव वाढून त्याचा परिणाम प्रत्यक्ष युध्दात झाला होता. त्यावेळी सोने दरात वाढ झाली होती. तशाच पध्दतीने इस्त्रायल-इराणमधील परिस्थिती निर्माण झाल्यास सोने आणि कच्च्या तेलातच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.

Check Also

हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून डिव्हीडंड जाहिर नफा २ टक्क्याने घसरला

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने बुधवारी चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) नफ्यात घट नोंदवली. “(मार्च २०२४) तिमाहीत रु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *