Breaking News

२९ व्या दिवशीही इस्त्रायलचे हल्ले सुरुचः तुर्कीने राजदूत परत बोलावला ओलिस नागरिकांना सोडत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच ठेवण्याचा इस्त्रायचा निर्धार

हमासच्या हल्ल्याला प्रतित्युर म्हणून इस्त्रायलने सुरु केलेल्या गाझा पट्टीवरील हल्ले काही केल्या थांबवायला तयार नाही. इस्त्रायलने हमासच्या नायनाटासाठी गाझापट्टीवर हल्ले आज २९ दिवशीही कायम ठेवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिका, युरोपमधील अनेक देशांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहु यांना मानवी वस्त्यांवर हल्ले करू नका असे आवाहन केलेले असतानाही हे हल्ले सुरुच ठेवले. त्यामुळे अखेर इस्त्रायली हल्ल्याचा निषेध म्हणून तुर्कीने राजदूत माघारी बोलावून घेतला.

तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अॅथोनी बिल्केन यांनी या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा इस्त्रायलचा दौरा करत हमासच्या विरोधात इस्त्रायलला पाठिंबा देत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बिडेन यांनी जाहिर केलेल्या भूमिका पुनःरूच्चार करत इस्त्रायलच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकही ठार होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली.

दरम्यान, इस्त्रायलने हमासने ७ ऑक्टोंबर रोजी हल्ला करत २४० नागरिकांना ओलिस ठेवले. त्या ओलिस नागरिकांची सुटका विनाअट होईपर्यंत हे हल्ले असेच सुरुच राहणार असून हमासशी कोणत्याही परिस्थितीत युध्दबंदी करण्यात येणार असल्याच्या भूमिकेचा पुनःरूच्चार केला.

इस्त्रायली हल्ल्यामुळे पॅलेस्टाईन नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असून जवळपास ७० टक्के नागरिकांवर घर सोडून परागंदा होण्याची वेळ आली आहे. तसेच इस्त्रायली हल्ल्यात तेथील रूग्णालयही लक्ष्य झाल्याने येथील गाझा पट्टीतील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. तसेच जखमी होणाऱ्या नागरिकांची संख्याही चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच गाझा पट्टीतील इंधनही संपत आले आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन नागरिकांवर मुलभूत गरजा भागविण्यासाठीही धावाधाव करावी लागत असल्याचे माहिती युनोने आपल्या प्रसिध्दीपत्रकातून दिली.

पॅलिस्टाईनी नागरिकांनी गाढा पट्टीतील युनोच्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. या छावण्यांमध्ये हमासचे सैनिक लपले या संशयावरून इस्त्रायलने केलेल्या आजच्या हल्ल्यात आज युनोच्या छावण्यांवर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे तेथे आश्रयाला आलेल्या अनेक पॅलेस्टीनी नागरिक ठार झाले. तर अनेक नागरिक जखमी झाल्याचे युनोने सांगितले.

इस्त्रायली हल्ल्यात २० नागरिक ठार झाल्याचा दावा युनोने केला. तर १५ नागरिक ठार झाल्याची माहिती इस्त्रायलच्यावतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांनी आज सांगितले की, इस्त्रायली हल्ल्यामुळे त्यांनीच जाहिर केलेली कॉटेन्मेंट धोरण अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. तसेच मानवी नरसंहारही होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सुरु हमास इस्त्रायल दरम्यान सुरु असलेले युध्द तात्काळ थांबविण्यासाठी इस्त्रायलवर दबाव आणावा अशी मागणी केल्याची माहिती रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली.

Check Also

विना ड्रायव्हर ७० कि.मी धावलेल्या रेल्वे मालगाडीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश

आज सकाळी अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर एक मालगाडी कोणत्याही आवाजाच्या शिवाय सुफरफास्ट धावत असल्याची एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *