Breaking News

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध कुक्कुटपालन सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शितलकुमार मुकणे, सहनिंबधक शहाजी पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत कुक्कुट पालन सहकारी संस्थांना दिलेल्या थकीत कर्ज फेडीबाबत सहकारी संस्थांकडून आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल. तसेच या बाबतीत वित्त विभागाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले.

कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आले असून या समितीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, समन्वय समितीचे सदस्य आणि खाजगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, समितीच्या कार्यकक्षेनुसार खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात शासनाच्या विविध विभागांशी आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत. ऊर्जा, ग्राम विकास, शालेय शिक्षण आदी विभागांना प्रस्ताव पाठविला आहे. समन्वय समितीमार्फत कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर व खाजगीरीत्या संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *