Breaking News

Tag Archives: animal husbandry

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या समस्याबाबत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, रघुनाथ दादा पाटील, इंद्रीस नायकवाडी यांच्यासह विविध …

Read More »

राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनाचे ७ दिवसांत १०० टक्के लसीकरण करा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण ७३ टक्के करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण ७ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. लसीकरण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील, …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील कृषी, जलसंपदा आणि जमिनींशी संबधित इतर महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेतले निर्णय

अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे “सिट्रस इस्टेट” तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे …

Read More »

पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांची ग्वाही, अंडी समन्वय समितीची स्थापना करणार कुक्कुटपालन व्यवसायाच्या वृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेणार

कुक्कुटपालन व्यवसायात वृद्धी व्हावी, तो शेतकरी हिताचा व्हावा या दृष्टीने आणि महाराष्ट्र अंडी समन्वय समितीची (एमईसीसी) स्थापना करण्याच्या अनुषंगाने सर्वंकष विचार करून अहवाल सादर करावा. त्याचा सकारात्मक विचार करून राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करा पशुसंवर्धन आयुक्त यांचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण  वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ११ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरीता पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून …

Read More »

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग  होण्याची भीती नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पी चर्म रोगाची …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाची मिळणार नुकसान भरपाई चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार

राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान …

Read More »

पशुधनाला लम्पीची लागण झाली? मग मंत्रालयातील ‘या’ नंबरवर संपर्क साधा मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना- प्रधान सचिव जे. पी. गुप्ता

राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२ गुप्ता म्हणाले,राज्यात …

Read More »

लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचलाः या टोल फ्रि वर करा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. …

Read More »

लम्पी त्वचारोगापासून बचावासाठी पशुसंवर्धन विभागाने जारी केल्या ‘या’ सूचना जनावरांतील लम्पी त्वचारोगाबाबत प्रतिबंधात्मक सूचना

गुजरात राज्यामधील काही जिल्ह्यामध्ये लम्पी त्वचा रोगाचा (लम्पी स्किन डिसीज) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात विशेषतः गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लम्पी त्वचा रोग हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य …

Read More »