Breaking News

अखेर बेंजामिन नेत्यानाहु यांनी मागितली माफी पत्रकार परिषद घेत मागितली माफी

इस्त्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर जगभरातून आणि इस्त्रायलमधूनही त्यावेळी इस्त्रायलची सेना आणि गुप्तचर संस्था काय करत होती असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी आपल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणा आणि सेना अधिकाऱ्यांवर टीकेची तोफ डागली होती. मात्र आज बेंजामिन नेत्यानाहु यांनी पत्रकार परिषद घेत अखेर आपल्याच देशाच्या सैन्याची आणि गुप्तचर यंत्रणेची माफी मागितली.

सध्या सुरु असलेल्या हमास आणि इस्त्रायलच्या युध्दात आतापर्यंत १४०० इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला तर ७००० हजार पॅलेस्टाईनीयन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी इस्त्रायलच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची युध्दाच्या अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीत इस्त्रायली मंत्र्यांनी बेंजामिन नेत्यानाहु यांनी हमासने ७ ऑक्टोंबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायली गुप्तचर संस्था आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती. त्या टीकेवरून अनेक मंत्र्यांनी बेंजामिन नेत्यानाहु यांच्यावर टीका केल्याचे सांगण्यात येत आहे.

या टीकेनंतरच बेंजामिन नेत्यानाहु यांनी गुप्तचर संस्था आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांची माफी मागितल्याचे सांगण्यात येत आहे.

पत्रकार परिषदेत बेंजामिन नेत्यानाहु म्हणाले की, ज्या गोष्टी मी सांगायला नको होत्या. त्या गोष्टी मी सांगितल्या आहेत. मात्र आता मी इस्त्रायली गुप्तचर संस्था आणि सैन्याची माफी मागितली आहे असे ट्विट करत सांगितले.

पुढे बोलताना बेंजामिन नेत्यानाहु म्हणाले की, हमासला गाझा पट्टीतून समुळ नष्ट करायचे आहे. त्यामुळे हमासच्या सैन्याचा समुळ नायनाट करायचा असल्याने इस्त्रायली सैन्य पूर्ण ताकदीनिशी पाठवित असल्याचेही सांगितले.

तसेच पुढे आपल्या ट्विटर पोष्ट मध्ये बेंजामिन नेत्यानाहु म्हणाले की, आता वेळ आली आहे की कठोर प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. अगदी स्वतःसह पण युध्दानंतर असेही स्पष्ट केले.

दरम्यान, इस्त्रायली नागरिकांकडून नेत्यानाहु यांच्या युध्दाच्या निर्णयाला आणि पॅलेस्टीनी नागरिकांच्या विरोधात उचण्यात येत असलेल्या पाऊलांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गाझातील रूग्णालयांवर करण्यात येत असलेल्या हल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विरोधी पक्षाचे सदस्य अवीदोर लिबेरमन (Avigdor Lieberman) यांनी बेंजामिन नेत्यानाहु यांच्यावर टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान नेत्यानाहु यांचे वक्तव्य हे ते ओलिस ठेवलेल्या नागरिकांबद्दल किंवा सुरक्षेबाबत त्यांचा रस नसून फक्त राजकारण करण्यात त्यांना रस असल्याची टीका केली.

तर विरोधी पक्षनेते याइर लॅपीड (Yair Lapid) म्हणाले की, आजच्या बेंजामिन नेत्यानाहु यांनी लाल रेषा पार केली असून आयडीएफ हमास आणि हिजबुल्लाच्या विरोधात लढत आहे. वास्तविक पाहता त्यांच्यावर आरोप करण्याऐवजी त्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप करत ते पुढे म्हणाले, नेत्यानाहु स्वतःला जबाबदार ठरवायला पाहिजे होते. परंतु ते इस्त्रायच्या शत्रशी लढणाऱ्या सैन्यावर दोषारोप ठेवत असल्याची टीका केली.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या जहाजावरील पहिला भारतीय क्रु मेंबर भारतात परतली

इराणी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी ताब्यात घेतलेल्या पोर्तुगाल ध्वजांकित MSC मेष या जहाजावरील सतरा भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *