Breaking News

फडणवीस यांचे ते वक्तव्य आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा अॅटर्नी जनरल तुषार मेहता यांच्या भेटीसाठी गेले दिल्लीला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी मुळ शिवसेनेत बंडखोरी करत शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष नावावर दावा केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या अपात्र आमदारांच्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. मात्र मे महिन्यात यासंदर्भातील निकाल दिलेला असतानाही अद्याप अंतिम निर्णय दिला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यशैलीवरून चांगलेच फटकारले. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे अपात्र ठरणार नसल्याचे वक्तव्य केल्यास २४ तासाचा अवधी लोटत नाही तोच आज सकाळी राहुल नार्वेकर नवी दिल्लीला पोहोचले असल्याची माहिती पुढे आली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिल्लीत पोहोचल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता म्हणाले की, देशाचे अॅटर्नी जनरल तुषार मेहता यांच्या भेटीसाठी आल्याचे स्पष्ट केले.

तुषार मेहता हे जरी देशाचे महाधिवक्ता असले तरी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्यावतीने तेच बाजू मांडत आहेत. त्यामुळे ते भेटीसाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचे वेळापत्रक न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जर जर न्यायालयासमोर सुनावणीचे वेळापत्रक सादर न केल्यास न्यायालय सुनावणीचे वेळापत्रक देईल असा इशारा देत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मागे ठेवायचे नसतात असे कोणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगा अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटाकारले होते.

त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल एका खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरूच शकत नाहीत. तसेच जर ते अपात्र ठरले तर एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेवर घेऊ असे निश्चयपूर्वक सांगत मात्र मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदेच राहतील असे निर्धारपूर्वक सांगितले.

काल शनिवारी २८ तारखेला खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आणि आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भारत सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या भेटीसाठी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबर अंमलबजावणी करण्यासाठी तर राहुल नार्वेकर गेले नाहीत ना असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *