Breaking News

भारतीयांच्यादृष्टीने अभिमानाचा क्षणः अमेरिकेतील जगप्रसिध्द ब्रॉड-वे ला डॉ आंबेडकर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शेअर केला व्हिडिओ

अमेरिकेतील न्युयॉर्क येथील ब्रॉड-वे हा जगप्रसिध्द परिसर, या परिसर आणि या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक, कलाकार यांचा वावर सातत्याने होत असतो. तसेच अनेक कलावंत आणि साहित्यिकांना या या भागात कार्यक्रमही करायचा असतो. खरं पाह्यचं झालं ब्रॉडवेचे एक वेगळेच आकर्षण कलाप्रेमीकांच्या जगतात आहे. आता या ब्रॉड-वेला जाणाऱ्या रस्त्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थतज्ञ, विचारवंत आणि वंचितांना आवाज मिळवून देणारे डॉ बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ बी आर आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. यासंदर्भातील एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आपल्या ट्विटर अकाँऊटवर नुकताच शेअर केला.

काही वर्षापूर्वी अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या उच्चवर्णीय समाजातील भारतीयांनी तेथे स्थलांतरीत झालेल्या दलित भारतीयांसोबत सापत्नपणाची वागणूक दिल्याची आणि भारतातील जात व्यवस्थेप्रमाणे तेथे नोकरी-रोजगारासाठी गेलेल्या दलित तरूण-तरूणीसोबत वागणूक दिल्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर भारताप्रमाणे अमेरिकेत ही दलितांच्या हक्कांचे संरक्षण करणारा कायदा करावा अशी मागणी तेथील स्थलांतरीत दलित समुदायाकडून अमेरिकन सरकारकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न्युयॉर्क येथील ब्रॉड-वे या रस्त्याला दिल्याने या घटनेस मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, ब्रॉड-वे रस्त्याला अमेरिकेतील न्युयॉर्कच्या स्थानिक प्रशासनाने कधी मंजूरी दिली, त्यासाठी तेथील कोणत्या संघटनेने पुढाकार घेतला याशिवयीचा सविस्तर तपशील समजू शकला नाही. मात्र ब्रॉड-वे रस्त्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा सोहळा साजरा करतानाचा व्हिडिओ छगन भुजबळ यांनी शेअर केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *