Breaking News

कॅनडा-अमेरिका- भारतः पितळ उघडे पाडण्यासाठी यंत्रणा लागल्या कामाला लवकरच तपास यंत्रणांची बैठक

एका कॅनेडियन नागरिकांचा मात्र भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या आंतरराष्ट्रीय भारतीय गुप्तचर संस्थेने केल्याचा आरोप कॅनडाने केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानेही कॅनडा हा देश दहशतवाद्यांचा अड्डा बनला असल्याचा प्रत्यारोप केला. या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा मधील संबधांमध्ये थोडीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची एक बैठक झाली. यात बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानची मागणी करणाऱ्या संघटनेशी संबधित असलेल्या लोकांच्या प्रॉपर्टीवर कब्जा करण्याचे आणि अशांना तुरुंगात पाठविण्याचे कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

परंतु या दोन्ही तपास यंत्रणांच्या देशाच्या सुरक्षाविषयक बैठकीत खलिस्तानवादी अनेक भारतात राहणाऱ्या लोकांना यापूर्वीच ताब्यात घेऊन त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आल्याची माहिती समोर आली. परंतु तुरुंगात पाठविलेल्यांचे म्होरके, गट प्रमुख किंवा त्यांचे हॅण्डलर हे कॅनडा आणि पाकिस्तानात असल्याची माहिती पुढे आली.

त्यामुळे खलिस्थानवादी समर्थकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे जाळे कुठपर्यंत पोहोचले आहे याचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून लावण्यात येत असून त्यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीयस्तरावर खलिस्थानवाद्यांचे नेटवर्क उघडकिस आणण्याचे कामही स्थानिक पोलिसांच्या मदतीने करण्यात येत आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि रॉ या संस्थेकडून १० गुन्ह्यांसंदर्भात तपास करण्यात येत आहे. यामध्ये गॅगस्टरशी संबधित असलेले लोक, दहशतवादी संघटनांचे लोक आणि खलिस्तानशी संबधित असलेल्यांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून येत आहे. तसेच त्यासाठी या दोन्ही तपास यंत्रणांकडून परेदश मंत्रालयाची मदत घेण्यात येत आहे.

खलिस्थानवादी आणि दहशतवाद्यांशी जाळे असलेल्यांच्या संपर्कातील लोकांची संपत्ती जप्त करणे, गॅगस्टरशी संपर्क असलेल्यांची मालमत्ता जप्त करणे आदी गोष्टी सध्या करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यानी दिली.

या बैठकीला सीबीआयचे प्रमुख तपन कुमार देखा, नॅशनल टेंक्निकल रिसर्च आदी जण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *