Breaking News

भारतात १५ डिसेंबरपासून क्रॅश टेस्ट सुरू या गाड्यांची प्रथम चाचणी होणार

देशात धावणाऱ्या कारला सुरक्षितता रेटिंग देण्यासाठी भारतीय एजन्सी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP किंवा BNCAP) १५ डिसेंबर २०२३ पासून क्रॅश चाचण्या सुरू करणार आहे. या याचणीसाठी आतापर्यंत वाहन कंपन्यांनी तीन डझनहून अधिक मॉडेल्सची नोंदणी केली आहे.

टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि महिंद्रा अँड महिंद्रासारख्या कंपन्या क्रॅश चाचण्यांच्या पहिल्या बॅचमध्ये सहभागी होतील. यापैकी टाटा मोटर्स ही आपल्या मॉडेल्सची नोंदणी करणारी पहिली कंपनी आहे. टाटा प्रथम हॅरियर आणि सफारीची क्रॅश चाचणी घेणार आहे. मात्र, आधी कोणत्या वाहनाची क्रॅश चाचणी केली जाईल याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, रेनॉल्ट, स्कोडा आणि फोक्सवॅगन यांसारख्या युरोपीय कंपन्यांनी अद्याप त्यांच्या कारची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला नाही. याआधी कारची क्रॅश टेस्ट १ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. पण सणासुदीच्या सीझनमुळे ती अद्याप सुरू होऊ शकली नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री नितीन गडकरी यांनी या वर्षी २२ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात BNCAP लाँच केले होते. यानंतर १८ सप्टेंबर रोजी पुण्यातील चाकण येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट येथे कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. येथे,

अलीकडच्या काळात सेफ्टी फीचर्सची मागणी वाढली आहे. टाटा-महिंद्रा सारख्या कंपन्या ५ स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या त्यांच्या गाड्यांची विक्री करत आहेत. त्यामुळे आता मारुती सुझुकी आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या देखील सेफ्टी रेटिंगद्वारे सुरक्षेचा प्रचार करत आहेत.
एजन्सी भारतीय परिस्थितीनुसार सेट केलेल्या नियमांनुसार कारची क्रॅश चाचणी करेल आणि त्यांना सुरक्षितता रेटिंग देईल. या चाचणीत कारला ० ते ५ स्टार रेटिंग दिले जाईल. ० स्टार म्हणजे असुरक्षित आणि ५ स्टार म्हणजे पूर्णपणे सुरक्षित.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

धनत्रयोदशीला बड्या ज्वेलर्सकडून दागिन्यांवर मोठी सूट

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *