Breaking News

केंद्र सरकारने लाँच केला भारत आटा आणि डाळी २७.५० रुपयांना मिळणार पीठ

गव्हाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सणासुदीच्या काळात पिठाच्या किमतीत झालेली वाढ पाहता सरकारने स्वस्त दरात पीठ आणि डाळी विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार देशभरात २७.५० रुपये प्रति किलो दराने भारत आटा तर डाळी ६० रूपये दराने उपलब्ध करून देणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी, ६ नोव्हेंबर रोजी दिल्लीत पीठ वितरण मोबाईल व्हॅनना हिरवा झेंडा दाखवला. हे पीठ १० किलो आणि ३० किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध केला जाईल.

भारत आटा देशभरातील २ हजार आउटलेटवर उपलब्ध असेल. त्याची विक्री नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED), नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF), सफाल, मदर डेअरी आणि इतर सहकारी संस्थांमार्फत केली जाईल.

यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, यासाठी विविध सरकारी संस्थांना २.५ लाख मेट्रिक टन गव्हाचे वाटप करण्यात आले आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात पिठाची सरासरी किंमत ३५ रुपये प्रति किलो आहे. बाजारात बिगर ब्रँडेड पिठाची किरकोळ किंमत ३० ते ४० रुपये किलो आहे. तर ब्रँडेड पीठ ४० ते ५० रुपये किलोने विकले जात आहे. तर डाळी राज्याच्या बाजारात १०० रूपये किलो दराने मिळत आहेत.

कांद्याच्या वाढत्या किमतीपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकार २५ रुपये प्रति किलो दराने कांदा विकत आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच आणि नाफेड आधीच २५ प्रति किलो दराने बफर कांदा विकत आहेत. नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया २० राज्यांमधील ५४ शहरांमध्ये ४५७ किरकोळ दुकानांवर अनुदानित दराने कांद्याची विक्री करत आहे. तर नाफेड २१ राज्यांतील ५५ शहरांतील ३२९ किरकोळ दुकानांवर सवलतीच्या दरात कांद्याची विक्री करत आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *