Breaking News

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले, दसरा मेळाव्याचा अधिकार आमचा एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांना घेवून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आपला हक्क सांगत निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्य बाणा वरही आपला हक्क सांगितला. आता एकनाथ शिंदे गटाने थेट शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आपला हक्क सांगितला असून यासंदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी मोठे विधान करत दसरा मेळाव्याचा अधिकार आमचा यासंदर्भात एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील असे सांगत एकच खळबळ उडवून दिली.

नुकतेच उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेला परवानगीसाठी पत्र देण्यात आले. मात्र मुंबई महापालिकेकडून अद्याप कोणतीही परवानगी शिवसेनेला देण्यात आलेली नाही. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी जाहिर टीका करत शिंदे गटाल दोष देण्यात आला. आता शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्यात आल्याने आगामी काळात एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे गटात आणखी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.

दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी “दसरा मेळावा शिवसेनेचाच होता आणि शिवसेनेचाच राहील अशी ठाम भूमिका मांडली होती. मात्र, अद्याप प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नसून हे गद्दार राजकारण करत असल्याची टीका शिंदे सरकारवर केली होती. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी एक मोठं विधान केले.

जे कुणी या दसरा मेळाव्यावर अधिकार सांगत आहेत, त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडले आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणता अधिकार आहे तो मेळावा करण्याचा?  असा सवाल नरेश म्हस्के यांनी शिवसेनेला विचारला आहे.

दसरा मेळावा घ्यायचा अधिकार आमचा आहे. आम्ही हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्यामुळे तो अधिकार आमचा आहे. कारण हा मेळावाच हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. कळेल तुम्हाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *