Breaking News

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या आणण्यात- मदत देण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर आहेत. मागील ३ मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी विशेष देणग्या आणल्या नसून यावर्षी केवळ ६५.८८ कोटी जमा केले असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या निधीत लक्षणीय वाढ केली आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांस कळविले की १ एप्रिल २०२२ रोजीची शिल्लक रु ४१८.८८ कोटी आणि ३१ मार्च २०२३ रोजी शिल्लक रु ४४५.२२ कोटी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्षनिहाय प्राप्त देणग्याची माहिती १ जानेवारी २०१५ पासून ते ३१ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर सर्वांत पिछाडीवर शिंदे आहेत.

निधीत सर्वाधिक वाढ ठाकरेंची

मुख्यमंत्री असताना ५ वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी ६१४ कोटींची वाढ केली तर २ वर्षात उद्धव ठाकरे यांनी ७९३ कोटींची वाढ केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ६५.८८ कोटींची वाढ केली.

गरजूंना मदत करण्यात फडणवीस अव्वल

मागील ८ वर्षात तीनही मुख्यमंत्र्यांत गरजूंना मदत करण्यात देवेंद्र फडणवीस अव्वल आहेत. फडणवीस यांच्या कार्यकाळात १ लाख ७ हजार ७८२ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ६३ हजार ५७३ नागरिकांना ५९८.३२ कोटींची मदत करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी १० हजार ७१२ पैकी ४ हजार २४७ नागरिकांना २०.२८ कोटी रुपयांची मदत केली तर एकनाथ शिंदे यांनी १४ हजार ५६६ पैकी ७४१९ नागरिकांना ५७ कोटींची मदत केली.

अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात हुशार आणि जबाबदार सनदी अधिका-यांची नेमणूक केल्यास निधीत वाढ होईल आणि पारदर्शकता राहील. लाभार्थीची यादी संपूर्ण तपशीलवार दिल्यास काही प्रमाणात होणारी बोगसगिरी थांबेल.

हिच ती माहिती अधिकारात मिळालेली कागदपत्रे

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

शंभुराज देसाई यांचे आश्वासन, सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक

राज्यातील सफाई कामगारांच्या सुविधांसाठी राज्य शासनाने लाड-पागे समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *