Breaking News

भाजपाची परिस्थिती म्हणजे, करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव उरळी कांचन ( पुणे-शिरुर) येथील जाहीर सभेत पवारांनी साधला मोदींवर निशाणा

मुंबईः प्रतिनिधी
पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला. मात्र क्रेडिट कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र श्रेय मोदी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आज पुणे जिल्हयातील शिरुर मतदारसंघातील उरळी कांचन येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
आघाडी सरकार असताना शिरूर भागात कारखानदारी आणली गेली. हे काही फडणवीस सरकारच्या काळात झालेली कामं नाहीत. मात्र आज अवस्था काय आहे ? पिंपरी-चिंचवड येथे मुलांना नोकऱ्यांमधून काढून टाकत आहेत. याला सरकार जबाबदार आहे. परिस्थिती सांभाळण्याची क्षमता यांच्यात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणुकांच्या प्रचाराचा पारा सध्या चढू लागला आहे. गुजरातचे एक भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेकदा जेलवारीही केली आहे. मी निवडणूक लढवत नाही तरी यांच्या तोंडात माझेच नाव. निवडणूक शरद पवार या एका नावावरच लढवत आहेत अशा शब्दात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता टीका केली.
मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात काही नोंद आहे का ? मी काही गोंधळ केला का ? जाब विचारता कसला ? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून ३७० चा मुद्दा पुढे केला जात आहे. अमित शाह महाराष्ट्रात सांगतात की, आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथलं घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार शेती करायला ? आहे का कोणी मायेचा पूत ? असा सवालही त्यांनी केला.
कुणी मुद्याचे बोलतच नाही… महागाईवर बोला… शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला… आत्महत्यांवर बोला… ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला…असा सल्लाही त्यांनी भाजप आणि शिवसेनेला आव्हान दिले.
अनेक जण आज पक्ष सोडून जात आहे. पक्षात रहायचे की नाही हे ज्याचे त्याचे मत आहे. सोबत आले तर बरं आहे. नाही आले तर दुखवटयाचा ठराव मांडून पुढे जायचं असेही त्यांनी शएवटी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *