Breaking News

भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजूर केले ‘हे’ ठराव भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या भाजपाच्या प्रदेश भाजपा कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली.

प्रदेश कार्यसमिती बैठक आज पनवेलच्या आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. याबाबत माहिती देताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले की, आजच्या बैठकीत तीन प्रस्ताव संमत झाले, राजकीय, कृषी विषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

राजकीय प्रस्ताव मांडताना गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारने राज्यात केलेल्या अधोगतीवर चर्चा करण्यात आली. भाजपा नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रस्ताव मांडला तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातील शिवसेनेने केलेला उठाव व स्थापन झालेल्या सरकारचे अभिनंदन करण्यात आले.

या सरकारने तीस दिवस पुर्ण होण्या आधीच इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन असे वेगवेगळे निर्णय घेतले तर संभाजी नगर, धाराशिव, लोकनेते दि.बा. पाटील विमानतळाचे नामकरण असो वा गणेशोत्सव, दहीहंडी व मोहरम सारख्या सणांचा निर्णय घेतले. ज्या गतीने सरकार काम करत आहे. पहिल्या तीन कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र हिताच्या निर्णयांची मालिका शिंदे – फडणवीस सरकारने घेतली त्याबद्दल सरकारचे अभिनंदन या ठरावात करण्यात आले.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्ताने घर घर तिरंगा या अभियानासह सशक्त बुथ यंत्रणा,आगामी निवडणुकांसाठी भाजपाची व्यूहरचना,ज्या बूथवर कमी मतदान झाले, त्याठिकाणी मतदान वाढवण्यासाठी काम करणार,ग्राम पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत हा विचार घेऊन संघटनात्मक रचना याबाबत सविस्तर चर्चा ही यावेळी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *