Breaking News

सत्ताधारी- विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यापुढे अखेर ऊर्जा मंत्र्यांनी मान्य केली मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांना अक्षरश बोलावून आणले

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा प्रश्न उपस्थित केला असतानाच शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्न ऐरणीवर आणला. मतदारसंघात गेले की शेतकरी विचारतात आमची वीज कापली गेली. काय करायचे? हातचे पीक पुन्हा एकदा जाईल काही तरी करा अशी आर्जवे शेतकरी करत असल्याचे सांगितले.

त्यामुळे राज्य सरकारकडून विशेषतः ऊर्जा विभागाकडून शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी केली. शिवसेना आमदाराच्या हीच मागणी भाजपाच्या सदस्यांनी उचलून धरत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज जवळपास चार वेळा तहकूब करण्याची पाळी राज्य सरकारवर आली.

पाचव्यांदा सभागृहाचे कामकाज सुरु झाले तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऊर्जा मंत्र्यांना बोलावून आणून त्यासंदर्भात निवेदन करायला सांगा नाही तर आम्ही सभागृहाचे कामकाज चालवू देणार नाही असा इशारा दिला.

त्यावर सासंदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी मंत्री सध्या नाहीत. ते आल्यानंतर यासंदर्भात चर्चा करून संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर करण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु विरोधकांचे आणि सत्ताधारी आमदारांचे समाधान न झाल्याने पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही पाठिंबा दिला. वीज प्रश्नावरून आजच सभागृहात चर्चा करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचा वीज प्रश्न हाती घेत विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली. यामुळे पहिल्यांदा पाच मिनिटासाठी सभागृह तहकूब झाले.

त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आमदारच वीजतोडणी विरोधात बोलत आहेत. नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे वीज तोडणी संदर्भांत आजच घोषणा करावी अशी मागणी केली. यावेळीही गोंधळ सुरूच असल्याने दुसऱ्यांदा पंधरा मिनिटासाठी सभागृह तहकूब केले.

तिसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरु होताच अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर चर्चा करण्यात येईल. त्यासाठी सरकारला वेळ देण्यात यावा असे सांगितले. तर, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या प्रश्नावर सरकारतर्फे चर्चा घडवून आणण्याची तयारी दर्शविली.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह होऊन सुरू दोन आठवडे सुरू झाले. चर्चा कसली करता. याचे श्रेय कोणालाच नको. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. परवा एकाने आत्महत्या केली. आज एक झाली. आत्महत्या होतच आहेत. त्यामुळे चर्चा नको तर घोषणा करा अशी मागणी केली.

वीज कनेक्शन तोडणी यावरून सत्ताधारी आमदारही नाराजी आता व्यक्त करत होते. शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबरोबरच आमदार महेश शिंदे यांनीही वीज तोडणी बंद करावी अशी मागणी करत आजच घोषणा करावी अशी मागणी केली. यावेळी सत्ताधारी आमदारही भाजपाच्या आवाजात आवाज मिसळत होते. त्यामुळे तिसऱ्यांदा कामकाज तहकूब करण्यात आले.

दुपारी बारा वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु होताच चर्चा नको निर्णय करा अशी मागणी करत विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली. मे पर्यंत वीज कनेक्शन कापणार नाही असे अजित पवार म्हटले होते. शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. मंत्री राऊत यांना सभागृहात बोलवा. वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवा. जर शेतकऱ्यांची बाजू मंडळी नाही तर शेतकरी आम्हाला फिरू देणार नाही. आम्ही कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जायचे असा सवाल फडणवीस यांनी केला.

यावर तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे आज सभागृहात उपस्थित रहाणार नाहीत असे त्यांनी कळविले आहे. त्यामुळे या प्रश्नावर उद्या चर्चा करू असे सांगितले. मात्र, विरोधक आपल्या मुद्यावर ठाम राहिले. यातच गोंधळ वाढत गेल्याने पुन्हा कामकाज १ पर्यत तहकूब करण्यात आलं.

त्यामुळे अखेर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना सभागृहात बोलावून आणण्यात आले. त्यानंतर राऊत यांनी शेतकऱ्यांचे पुढील पिके हाती येईपर्यंत तीन महिने वीज तोडणी थांबविण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

Check Also

नाना पटोले म्हणाले,…मीच प्रदेशाध्यक्ष राहणार महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक

महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *