Breaking News

दरेकरांच्या प्रश्नी बोलताना फडणवीसांच्या माहितीची राष्ट्रवादीच्या आमदाराने केली दुरूस्ती प्रविण दरेकरांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हेप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा

अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान काल विधानसभेत बोलताना विधानसभेतील विरोधई पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता महाविकास आघाडीकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लक्ष करणार असल्याचे ऐकत आहोत. परंतु आम्ही कोणत्याही कारवायांना घाबरणार नाही असा इशारा दिला होता. त्यास २४ तासाचा अवधी मिळत नाही तोच प्रविण दरेकर यांच्या विरोधात आज मंगळवारी सकाळी धनंजय रामचंद्र शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात झाला. यावरून विधानसभेत देवेंद फडणवीस यांच्यासह भाजपाचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले.

विधानसभेच्या कामकाजाला सुरवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा मुद्दा उपस्थित. कालच आम्ही अशी कारवाई होणार याचे संकेत दिले होते आणि आज कारवाई झाली.

प्रवीण दरेकर हे मजूर संस्थेतून निवडून आले आहेत. तरीही त्यांच्यावर सूड भावनेने गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आम्ही न्यायालयात जाऊ. तुम्ही काहीही कारवाई कराल. पण हरकत नाही असा इशारा दिला.

इतिहासात असे कधी घडले नव्हते. दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार असाल पण तसे होणार नाही. राज्यात जे जे कोणी मजूर संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याची यादी आम्ही सरकारला देऊ. पाहू सरकार कोणा कोणावर कारवाई करते? असे आव्हानही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीला दिले.

जळगावमध्ये राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर हे मजूर संस्थेचे अध्यक्ष आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार? असा सवाल फडणवीस यांनी केला. यावर, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी संध्याकाळपर्यत निवेदन देऊ सांगितले.

त्यावर अंमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती चुकीची असून गुलाबराव देवकर यांचे नाव कोणत्याही मजूर संस्थेवर नाही असा खुलासा केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *