राज्य शासनामध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी कंत्राटी, तदर्थ हंगामी नियुक्ती असलेले व नंतर सेवेत घेतलेल्या किंवा कायम झालेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भात शासनाने १९ जानेवारी २०१९ रोजी वित्त राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगट समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री …
Read More »मराठा आरक्षण : राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन अशोक चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती
राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन होणार असून, त्यामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विधान परिषदेत नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेला …
Read More »अजित पवार आणि अनिल परब यांनी दिली एसटी कर्मचा-यांना आता शेवटची संधी ३१ मार्चपर्यंत कामावर येण्याची शेवटची संधी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा
अधिवेशनाच्या कार्यकाळात भाजपाच्या आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने निवेदन करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि परत कामावर हजर व्हावे असे आवाहन करत ३१ मार्च पर्यत कामावर हजर होणाऱ्यांना सेवेत सामावून घेणार असल्याचा अंतिम अल्टीमेटम दिला. तर विधानभवानतील विधिमंडळ …
Read More »अजित पवार म्हणाले की, उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स गेला भाजपाच्या नेत्यांना चिमटे, टोलेबाजीने
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलल्यानंतर उर्वरीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच विरोधकांची चांगलीच फिरकी घेत टोलेही लगावले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही काळा आधी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री होण्याची संधी होती (खडसेंबाबत उद्देशून बोलत). मात्र आता ती गेली. मात्र …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, तुमचा “तो” गैरसमज काढून टाका मी म्हणजे महाराष्ट्र आणि मी म्हणजे मुंबई हा गैरसमज काढून टाका
आता काहीजण म्हणाले तुम्हाला काय टीका करायचीय ते माझ्यावर करा पण महाराष्ट्रावर आणि मुंबईवर करू नका. मुळातच महाराष्ट्रावर कोण टीका करतंय आणि काय करेल असा सवाल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात तुमच्या डोक्यात असलेला तो गैरसमज काढून टाका असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना …
Read More »दाऊदच्या नावावर मते मागणार का? “त्या” जमिनीची किंमत चंद्रकांत पाटलांनी ठरविली पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असतात तर या दोघांशी मांडीशी माडी लावून बसला असतात
विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी आलोय मी तळमळीने बोलणार असून मला खोटं बोलता येत नाही. मागील काही दिवसांपासून जी काही बदनामी सुरु केलीय तुम्ही लोकांनी त्या बद्दल मी काही बोलणार नाही. पण किती खालच्या स्तरापर्यंत करायची याला काही धरंबद आहे का? सारखं सारखं दाऊद दाऊद असा नामोल्लेख सुरु आहे. …
Read More »मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले, शिखंडीच्या आडून वार करणे बंद करा, मला टाका तुरुंगात मेहुण्याच्या मालमत्ता जप्तीवरून आणि पत्नीची मालमत्ता उघडकीस आणण्यावरून विरोधकांवर निशाणा
मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तांवरून सातत्याने निशाणा साधला जात आहे. तसेच मालमत्तांवर ईडीकडून ज्या काही जप्तीच्या कारवाया करण्यात येत आहेत. त्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांना सडेतोड उत्तर देत, जे काही आरोप करायचे आहेत ते आरोप माझ्यावर करा, चला मी तुमच्या सोबत येतो …
Read More »ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही सर्व फंडातून निधी उपलब्ध करून देणार-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची ग्वाही
मागील काही वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच या घटना प्रामुख्याने शाळेच्या आवारातच घ़डत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टी कोणातून सीसीटीव्ही बसविणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. विधानसभेत शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील मुद्दा काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, धारावी रखडली…काय तो एकदा निकाल लावला पाहिजे २९३ वरील चर्चेवर निवेदन करताना केला आरोप
मागील १५ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या धारावी पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले असून धारावीच्या विकासासाठी राज्य सरकार प्रयत्न कर आहे. काही योजना मनात असतात परंतु त्या आपल्या हातात नसतात असे सांगत पैसे देवून केंद्र सरकारने आपल्याला अद्याप जमीन हस्तांतरीत केली नसल्याने हा विकास रखडल्याचा आरोप मुख्यमंत्री उध्दव …
Read More »कोरोना काळात शालेय शुल्क नियामन समित्या कुठे होत्या? भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांचा सवाल
कोरोना काळात जेव्हा शाळा बंद होत्या मात्र शाळांच्या फी वाढ होत्या. पालक आक्रोश करीत होते, आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावत होतो. त्यावेळी या शुल्क नियमन समित्या काय करीत होत्या ? कुठे होत्या ? असा सवाल भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी विधानसभेत केला. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११ मध्ये सुधारणा …
Read More »