Breaking News

Tag Archives: budget session 2022 of maharashtra

ओबीसी आरक्षणप्रश्नावरून फडणवीस-भुजबळांमध्ये खडाजंगी विधानसभेत ओबीसी आरक्षणावर गदारोळ , गोंधळातच उरकले कामकाज

विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्ताव सादर करत सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला सारून ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलीच खडाजंगी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा, ओबीसींविषयी नव्याने विधेयक मांडणार सरकारवर कोणाचाही दबाव नाही आणि कोणी टाकूही शकत नाही

ओबीसी समुदायाचे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर केला. परंतु राज्य सरकारने सादर केलेल्या अहवाल न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे ओबीसी समुदायाला आरक्षण परत मिळण्याची उरलीसुरली आशा मावळली. यापार्श्वभूमीवर राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपणार आहे. त्यामुळे या निवडणूका थांबविण्याबाबत …

Read More »

अहवाल सादर केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परबांनी दिला अल्टीमेटमः वाचा अहवाल १० मार्चपर्यंत कामावर हजर व्हा, बडतर्फीची कारवाई मागे घेवू

राज्यातील हजारो एसटी कर्मचारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेला एसटी विलगीकरणाचा अहवाल आज राज्य विधिमंडळात परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडत ते पुढे म्हणाले की, एसटी महामंडळ रद्दबातल करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शासनाला चालविणे शक्य नाही. एसटीचे विलगीकरण शक्य नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून त्यांच्या मार्फत एसटी चालविली जाणार …

Read More »

“नवाब मलिक सरकार हाय हाय ?” आणि भाजपाने केली चुकीची दुरूस्ती चुकलेल्या घोषणेनंतर केली सारवा सारव

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या काही दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉंडरींग प्रकरणी अटक केली. मात्र त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून अधिवेशनाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा भाजपाने दिला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत भाजपाच्या सदस्यांनी मलिक …

Read More »

विधानसभेत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून विरोधकांककडून गोंधळ गोंधळातच शासकीय कामकाज उरकले

जमिनीची खरेदी अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या व्यक्तींकडून केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत भाजपाच्या सदस्यांनी गदारोळ घातला. त्यामुळे गोंधळात सरकारला कामकाज पुढे रेटावे लागले. दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांना अटक झाली आहे. तरी …

Read More »

राज्यपालांच्या न केलेल्या भाषणात नेमके आहे काय? वाचा सविस्तर भाषण सविस्तर भाषण वाचकांसाठी आहे तसे

सभापती महोदय, अध्यक्ष महाराज व राज्य विधानमंडळाचे सन्माननीय सदस्यहो, राज्य विधानमंडळाच्या, २०२२ या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना, मला अतिशय आनंद होत आहे. 2. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान …

Read More »

राज्यपालांच्या “त्या” कृतीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, केवळ भाजपाच्या… राज्यपालाकडून राष्ट्रगीताचा अवमान: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

भाजपा आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हीही विरोधी पक्षात होतो. पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही. राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास …

Read More »

राज्यपाल कोश्यारींनी अभिभाषण अर्धवट सोडणे हा महाराष्ट्राचा अपमान राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु !: नाना पटोले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असा …

Read More »

Budget Session: भाजपाच्या घोषणा, राज्यपालांचे २ मि.भाषण आणि राष्ट्रगीताचा अवमान घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी २ मिनिटात घेतले भाषण आटोपते

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात सांसदीय प्रथेप्रमाणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपाला कोश्यारी यांनी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात अभिभाषणासाठी आले. मात्र भाषण सुरु केल्यानंतर भाजपाचे आमदारांनी सरकार विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केल्याने राज्यपालांनी आपले भाषण दोनच मिनिटात आटोपते घेतले आणि राष्ट्रगीताची वाट न पाहताच थेट निघून गेले. …

Read More »

राज्यातील मविआ सरकार म्हणजे दाऊदचे समर्थक आणि शेतकऱ्यांचे विरोधक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री थेट अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी व्यवहार करतो आणि त्याला वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य सरकार उभे राहते. असे कधी घडले नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत एकाबाजूला दाऊदशी व्यवहार करणाऱ्यास वाचविताना दुसऱ्याबाजूला राज्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम या सरकारकडून सुरु असून दाऊदचे समर्थन करणारे शेतकरी …

Read More »