Breaking News

Tag Archives: budget session 2022 of maharashtra

जनता मराठीतून कामकाज करणार आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा देणार का? भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांचा सवाल

स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणे यांचा कारभार मराठीतूनच झाला पाहिजे या कायद्याला आमचा पाठींबा असल्याचे आधीच स्पष्ट करत या विधेयकावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी जनतेला मराठीतून कामकाज करण्याची सक्ती आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा असा दुजाभाव करणा-या तरतुदी असल्याकडे लक्ष वेधत काही सुधारणा मराठी विधेयकात सुचविल्या. विधानसभेत आज महाराष्ट्र राज्यातील …

Read More »

राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये फक्त मराठीच विधानसभेत मराठी भाषा विधेयक मंजूर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपरिषदा आदींच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर व्हावा या उद्देशाने राज्य सरकारने मराठी राजभाषा विधेयक आज सकाळी विधानसभेच्या विशेष सत्रात मांडत ते एकमताने मंजूर ही करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकिय प्रयोजनासाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरीता तरतूद करण्यासाठी विधेयक मराठी भाषा मंत्री …

Read More »

सामाजिक न्याया विभागाकडून पंचतारांकित शाळा सुरु करणारः विभागाचा निधी वाढवा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

राज्यात २०११ च्या जणगणनेनुसार जवळपास ११ टक्के मागासवर्गिय जनता विविध योजनांच्या लाभासाठी पात्र आहे. त्यामुळे सध्या असलेल्या आर्थिक निधीत वाढ करण्याची गरज असून यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देत औरंगाबादेत ११ एकर जागेत पंचतारांकित शाळा सुरु करण्यात येणार असून …

Read More »

शासकीय सेवेतील भरती टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल मार्फत होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांचे उत्तर

राज्यातील आरोग्य सेवा परिक्षा व म्हाडा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

शेलारांच्या हरकतीमुळे अखेर विधानसभा झाली तहकूब, पण अजित पवारांनी दिली ग्वाही मंत्रीच सभागृहात उपस्थित नसल्याने राज्य सरकारवर आली वेळ

विधानसभेत लक्षवेधीला मंत्रीच उपस्थित नसल्याचा मुद्दा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित करत मंत्री सभागृहात हजर नाहीत तर चर्चा कोणाबरोबर करायची असा सवाल करत मंत्री सभागृहात येत नाहीत. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करा अशी मागणी केली. त्यावर तालिका अध्यक्ष संजय सिरसाट म्हणाले, सभागृहात मंत्री राजेंद्र शिंगणे आणि राज्यमंत्री संजय बन्सोड …

Read More »

फडणवीसांच्या “डंके की चोट”वर जयंत पाटील म्हणाले “फारच बोअर आहे” द काश्मीर फाईल्सवरून जयंत पाटील यांचा चिमटा

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण झालेले असताना या चित्रपटाचे पडसाद अधूनमधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटताना दिसून येत आहे. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट पाहिला. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांना चिमटे काढल्याचे दृष्य सभागृहात पाह्यला मिळाले. विधानसभेत काही सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही चित्रपट बघायला गेला …

Read More »

मंत्री थोरात म्हणाले, आम्ही तुमच्याच अकृषिक कायद्याचे पालन करतोय, पण तुर्तास स्थगिती नोटीशींना दिली अखेर स्थगिती

मुंबई उपनगरातील शेकडो सोसायट्यांना देण्यात आलेल्या अकृषिक करांच्या नोटीसीवरुन विधानसभेत आज जोरदार चर्चा झाल्याचे पहायला मिळाले. मुंबईतील जवळपास सर्वच पक्षातील आमदारांनी याप्रश्नी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अखेर सोसायट्यांना देण्यात आलेल्या अकृषिक करांच्या नोटीसींना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, या कराच्या नियमात बदल …

Read More »

ओसी नसलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी खुषखबर: सरकार आणणार नवा कायदा राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार- एकनाथ शिंदे

मुंबई शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर इमारती उभारल्या जात आहेत. मात्र यातील अनेक इमारतींना रहिवाशी रहायला आल्यानंतरही वर्षानुवर्षे ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालेला नाही. त्यामुळे अनेक रहिवाशांना पाणी कर, मलनिस्सारण कर दुप्पट भरावा लागतो. विकासकाने न भरलेल्या करांमुळे रहिवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागत.  त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना …

Read More »

मेट्रो प्रकल्पग्रस्तांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करणार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नगरविकासमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग ५ ची लांबी २४.९ …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून अधिवेशनात गोंधळ, अखेर सरकारने दिले हे आश्वासन अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार भूमिका मांडणार

मागील तीन महिन्याहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्याचबरोबर याप्रश्नावर न्यायालायतही याचिका दाखल आहे. न्यायालयाच्या तारखांवर तारखा पडत आहेत. निर्णय होत नाही. यापार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा ट्रक चालून उदरनिर्वाह चालवित आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारने चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी भाजपाचे आमदार ॲड. …

Read More »