Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, तुमचा “तो” गैरसमज काढून टाका मी म्हणजे महाराष्ट्र आणि मी म्हणजे मुंबई हा गैरसमज काढून टाका

आता काहीजण म्हणाले तुम्हाला काय टीका करायचीय ते माझ्यावर करा पण महाराष्ट्रावर आणि मुंबईवर करू नका. मुळातच महाराष्ट्रावर कोण टीका करतंय आणि काय करेल असा सवाल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात तुमच्या डोक्यात असलेला तो गैरसमज काढून टाका असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांना आवाहन करत म्हणाले होते की, माझा जीव मुंबई आणि महाराष्ट्रात अडकला असलेल्याचे सांगत माझ्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर टीका करू नका असे आवाहनही केले.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात महाराष्ट्रावर कोण टीका करत, मुंबईवरही कोण टीका करतंय मी म्हणजे मुंबई आणि मी म्हणजे महाराष्ट्र हा जो काही गैरसमज तुमच्या डोक्यात आहे. आधी तो काढून टाका असा उपरोधिक टोला लगावला.

तसेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चे दरम्यान जो काही भ्रष्टाचार उघडकीस आणला त्यासंदर्भात राज्य सरकारने एकही अक्षर काढले नाही की त्यावर उत्तर दिले नाही. त्याचबरोबर १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींसोबत व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांची पाठराखण मुख्यमंत्र्यांनी करणे कितपत योग्य आहे असा सवाल करत किमान मुख्यमंत्री ठाकरे तरी त्यांचा राजीनामा मागतील घेतील अशी अपेक्षा होती. परंतु उलट त्यांनी पाठराखण केली. त्यामुळे आम्ही सभात्याग करत असल्याचे सांगत सभात्याग केला.

त्यानंतर विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, सरकारने आम्ही केलेल्या एका आरोपावर उत्तर देण्याऐवजी पळ काढला. तसेच या सरकारने शेतकऱ्यांसाठी एकही नवी योजना किंवा घोषणा केली नाही. या अधिवेशनात सरकारने फक्त वेळ वाया घालविला. सरकार कसेही वागत असले तरी आम्ही सर्वबाजूंनी लढायला तयार आहोत.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याने संभ्रम, शिवसेनेत आहे की नाही? जळगांवच्या सभेत बोलताना शिवसेनेत असताना असा शब्द प्रयोग केल्याने संभ्रम

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित वेगळी चूल मांडणारे मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published.