Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, भयंकर महत्वकांक्षा आणि ढासळती… शिंदे-फडणवीस सरकारवर सोडले टीकास्त्र

वेदांत फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी चांगलेच तापले आहे. तसेच यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका़ सुरू असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी या तिन्ही प्रकल्पांवरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. यावेळी आपल्या ट्विटर हॅडलवरून आदित्य ठाकरे म्हणाले की, भयंकर महत्वकांक्षा आणि ढासलेली प्रशासकिय व्यवस्था हे महाराष्ट्राचं अपयश असल्याची खोचक टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. गुंतवणूकदरांचा राजकीय स्थिरतेवरील आणि शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकट काळात सरकार मदत करेल यावरून विश्वास उडाला आहे. भयंकर महत्वकांक्षा आणि ढासळलेली प्रशासकीय व्यवस्था हे महाराष्ट्राचं अपयश आहे.

वेदांत- फॉक्सकॉन, टाटा-एअरबस आणि सॅफ्रन सारखे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी ही आज पत्रकार परिषद घेत,एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. यावरून शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *