Breaking News

मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय, विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी सीआयडी मार्फत चौकशी होणार

काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचा बीडहून मुंबईकडे येताना माडप बोगदा पास केल्यानंतर झालेल्या अपघातात मेटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने मेटे यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना दिले.
यासंपूर्ण अपघाताची आणि त्यांच्या मृत्यूची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात धाव घेतली होती. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.

त्यानुसार आज शिंदे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले. मेटे यांच्या कार्यकर्त्यांकडून अपघाताबाबत संशय व्यक्त होत आहे. हा अपघात नव्हे तर घातपात असल्याची कार्यकर्त्यांना शंका आहे. या पार्श्वभूमीवर मेटेंच्या अपघाताची चौकशी महत्वाची मानली जात आहे.

त्याचबरोबर मेटेंच्या गाडीच्या ड्रायव्हरचे जबाबही सातत्याने बदलत आहेत. याशिवाय शिवसंग्राम संघटना आणि त्यांच्या राजकिय वाढत्या वजनामुळे मेटे यांचा घातापात करण्यात आल्याचा संशयही त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. तसे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *