Breaking News

Tag Archives: vinayak mete

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राज्यांना नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य ठरवित एखाद्या जातीला आणि जमातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे ठरविण्याचे अधिकार १०२ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य सरकारला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने ३:२ या मताने निर्णय दिला. त्यामुळे राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण आता संपुष्टात आले. …

Read More »

आरोग्य विभागाच्या पदभरतीतील या पदांसाठी पुन्हा परिक्षा घेणार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागातील ५४ संवर्गातील ३ हजार २७६ पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ५१ संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही.  ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

मंत्री चव्हाणांचा सूचक प्रश्न, विनायक मेटे कोणत्या पक्षाचे आहेत? मराठा आरक्षणप्रकरणी झालेल्या बैठकीनंतर चव्हाणांचे वक्तव्य

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेत काल चर्चाही झाली. त्यावेळी मराठा समाजाचे नेते विनायक मेटे हे उपस्थित होते. मात्र ते कोणत्या पक्षाचे आहेत? असे सूचक उत्तर देत त्यांचे धोरण कोणत्या पक्षाच्या कार्यलयात ठरविले जाते जगजाहीरच असल्याचा टोला …

Read More »

ईड्ब्ल्यूएस आरक्षणावरून विनायक मेटेंची पुन्हा पलटी मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर भाजपा नेत्यांकडून होणारे राजकारण दुर्दैवी!: सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात एके ठिकाणी राज्य सरकार न्यायालयीन पातळीवर निकराने लढा देत असताना भाजपा नेते मात्र त्यावर हीन पातळीचे राजकारण करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपा नेते जाणीवपूर्वक आपल्या भूमिकांमध्ये एकवाक्यता ठेवत तर नाहीतच परंतु भूमिकामंध्ये सातत्याने बदल हा राजकीय स्वार्थ कसा साधता येईल या उद्देशाने केला जात …

Read More »

मुख्यमंत्री, उद्योजक, कारखानदार असणा-या समाजाला मागासवर्गाचे आरक्षण कसे? मराठा समाजाच्या मतांच्या फायदासाठीच आरक्षण: अॅड सदावर्ते

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पी. एस पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. याआधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकून घेतली होती. त्यानंतर आज विरोधकांची बाजू ऐकून घेतली. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण लागू करणे कसे अयोग्य आहे? …

Read More »

५० जणांचे बलिदान, स्मारक गैरव्यवहार प्रकरणी शांत राहणारे मेटेंचे आरोप म्हणजे कटाचा भाग? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या छुप्या विरोधकांनी कट-कारस्थाने सुरू केल्याचा संशय असून, विनायक मेटेंनी राज्य सरकारविरूद्ध सुरू केलेले धादांत खोट्या आरोपांचे सत्र हा त्याच कटाचा भाग असू शकतो, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्याबाबत राज्य सरकारने चांगली …

Read More »

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार आता अजित पवारांच्या विभागाखाली स्वायत्तता कायम राहणार तात्काळ ८ कोटींचा निधी

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले. मात्र अखेर आज झालेल्या बैठकीत सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक मागास महामंडळाचा कारभार वित्त व नियोजन विभागापैकी नियोजन विभागाच्या खाली चालणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसचे …

Read More »

शिवस्मारकाच्या निविदेबाबत कॅगच्या आक्षेपांची चौकशी करणार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाकरिता राज्य शासन आग्रही आहे. मात्र यापूर्वी झालेल्या निविदा प्रक्रियेबाबत महालेखाकारांनी उपस्थित केलेल्या गंभीर आक्षेपांची चौकशी करून त्यानंतरच पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिली. विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात आज शिवस्मारकाबाबत तारांकित प्रश्न …

Read More »

भाजपाने मित्रपक्षांना त्यांची जागा दाखविली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेसाठी निवडणूका होत असून या निवडणूकीत भाजपा-शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना भाजपाने त्यांची जागा दाखविली अर्थात मित्रपक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी जागा दिल्याचा खुलासा करत आपल्या वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या सूचक अर्थाची सारवा सराव करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. ओबीसी, भटके-विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजातील …

Read More »

छत्रपतींच्या स्मारकाला तांत्रिक परवानगी नाही सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा नवाब मलिक यांचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे दोन वर्षापूर्वी मोदींनी जलपूजन केले होते. परंतु पुढे त्याचे काही झालेले नाही. …

Read More »