Breaking News

मुंबई महापालिकेच्या प्रसिध्दी पत्रकातून मिळणार उपलब्ध खाटा, ऑक्सीजन बेडची माहिती मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम

सरत्या वर्षापासून मुंबई शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांना त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर रूग्णालयात बेड उपलब्ध आहे की नाही यापासूनची माहिती गोळा करावी लागते आणि उपचार मिळण्यात दिरंगाई होते. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेकडून रोज संध्याकाळी रूग्णालयातील उपलब्ध खाटा, ऑक्सीजन बेड आणि लक्षणे नसलेल्या रूग्णांची माहिती मुंबई महापालिकेच्या प्रसिध्दी पत्रकातून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

यासंदर्भातील माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दिली.

याशिवाय मुंबईतील कोरोनाबाधितांवर लवकरात लवकर उपचार मिळावे यासाठी शहरातील सर्व कोरोनाची चाचणी करणाऱ्या लॅबकडून दिवसातून दोनदा बाधितांचे अहवाल मुंबई महापालिकेकडे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या दोन महत्वाच्या गोष्टीमुळे आता मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. तसेच बाधितांना योग्य उपचार मिळून त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच शहरातील कोरोनाबाधितांना रूग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती, ऑक्सीजन बेडची माहिती आणि लक्षणे नसलेल्या रूग्णांची माहिती दररोज महापालिकेकडून उपलब्ध करून देणारी मुंबई महापालिका ही पहिलीच महापालिका ठरणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेप्रमाणे राज्यातील इतर महापालिकांनी उपलब्ध करून दिल्यास कोरोनाबाधितांना एकप्रकारे दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *