Breaking News

नागपूरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपातर्फे भव्य स्वागत नागरिकांनीही सहभागी होण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ११ डिसेंबर रोजी नागपूर शहरात येत असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे उत्साहाने भव्य स्वागत करण्यात येईल. नागरिकांनीही मोदीचे स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूर …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, तुमचं मत ट्रॅव्हल एजन्सीसारखं… घनसावंगी येथील साहित्य समेंलनाचे उध्दव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज शनिवारी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोलाही लगावला. …

Read More »

आणि लावणीचा ठसकेबाज सुरेल आवाज हरपला… लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांनी घेतला अखेरचा श्वास

गेली ४०-५० वर्षापासून मराठी चित्रपटातील लावणी ऐकायची तर फक्त सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील अशी अनोखी ओळख बनलेल्या लावणी पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांनी आज वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली.सुलोचना चव्हाण आता प्रत्यक्ष जरी नसल्या तरी त्यांच्या ध्वनीमुद्रित गाण्याच्या माध्यमातून आपल्या सोबत सदैव …

Read More »

राज्य सरकारने एसटीला दिले ऑक्टोबरच्या वेतनासाठी २०० कोटी राज्य सरकारने ३६० कोटी द्यावेत, कर्मचारी संघटनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन थकले असून शुक्रवारी राज्य सरकारने महामंडळाला २०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही रक्कम अपुरी असून दरमहा वेतनासाठी ३६० कोटी रुपये द्यायला हवेत, असे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाने मागील थकबाकी आणि ऑक्टोबरच्या वेतनासाठी सरकारकडे ७९० कोटी रुपयांची मागणी केली …

Read More »

रात्रशाळांचे धोरण ठरविण्यासाठी नवी समिती गठीत समिती एका महिन्यात अहवाल सादर करणार

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री रात्रशाळेबाबत सर्वकष धोरण आखण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार रात्रशाळेबाबत सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवाविषयक बाबी, रात्रशाळेचा संचमान्यता, रात्रशाळेची गरज तसेच रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन …

Read More »

खासदार डॉ अमोल कोल्हेंचा संसदेत माईक बंद करण्यावरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेची झोड

महाराष्ट्रातील सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच …

Read More »

अमित शाह यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्याची नोंद घेतील असा विश्वास कर्नाटक आणि राज्यपालांच्या विरोधात तक्रारी केल्या

मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे अवमानकारक वक्तव्य केले. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करण्यास सुरुवात करत उचकाविण्याचाही प्रयत्न केला. या सर्व प्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर …

Read More »

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांवरील कारवाईप्रश्नी ईडी विरोधात याचिका अँड. नितीन सातपुते यांनी दाखल केली याचिका

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार आणि खासदारांना ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने नोटीसा पाठविल्या. मात्र ज्यांना नोटीसा पाठविल्या त्या आमदार-खासदारांनी शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर या ईडीने काय कारवाई केली? की या सर्वांनी भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून पुढची कारवाई …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, भाजपाच्या चंद्रकांत पाटलांना ‘भीक’ आणि ‘लोकवर्गणी’तला फरक तर कळतो का? भाजपा नेत्यांनी महापुरुषांच्या बदनामीचे ‘भिकारचाळे’ बंद करावे

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बौधिक दिवाळखोरी निघाली असून महापुरुषांबद्दल अपमान करणारी वक्तव्ये करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर भाजपाच्या एकाही नेत्यांने अजून माफी मागितली नसताना भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्राकात पाटील यांनी महात्मा ज्योतीबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान, फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळेसाठी भीक मागितली नव्या राजकिय वादाला सुरुवात

मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठलं होतं. तसेच भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजी राजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यपालसह भाजपा विरोधात …

Read More »