Breaking News

उध्दव ठाकरेंच्या सभे आधीच नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर

जानेवारी महिन्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहिर सभा होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तसेच सध्या नाशिकच्या दौऱ्यावर संजय राऊत आहेत. मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केला. यापूर्वी संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना १२ माजी नगरसेवकांनी प्रवेश शिंदे गटात प्रवेश …

Read More »

संजय राऊत यांचे राणेंना आव्हान, धमक्या देत असाल तर राजवस्त्र काढून या तुरुंगात टाकणार असल्याच्या नारायण राणेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांचा पलटवार

काल शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटातील नेते खासदार संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा दिला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणे यांनी वरील विधान केले. नारायण राणेंच्या या इशाऱ्याला आज …

Read More »

राज्यातील कुलगुरूंच्या बैठकीत झाली या विषयावर चर्चा विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे

विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी …

Read More »

अमित शाह यांनी जाहीर केली राम मंदीराची तारीख राहुल गांधी यांचे नाव घेत त्यांच्या जून्या टीकेचा संदर्भ देत तारीख जाहीर केली

देशातील जवळपास सर्वच लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपाने सातत्याने राम मंदीर उभारणीचा मुद्दा निर्माण करत लढविल्या. त्यानंतर मधल्या काळात कधी राम मंदीर उभारणीचा मुद्दा मागे ठेवला. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मस्जिद प्रकरणी अंतिम निकाल दिल्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर टीका करण्यास …

Read More »

आदित्य ठाकरेंचा खोचक टोला, आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम स्थायी समितीने मंजूर केलेली १७०० कोटींची कामे आयुक्त कशी बदलू शकतात?; आदित्य ठाकरेंचा सवाल

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज गुरुवारी अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनियर केजीच्या वर्गाच्या नूतनीकरणाचं आज उद्घाटन केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवत निवडणुका घेण्याचं खुलं आव्हान दिलं. महापालिकेच्या निवडणुका घ्या, तसंच विधानसभेच्या निवडणुका …

Read More »

चला! जाणून घेऊ या संरक्षण दलाची सज्जता आणि सक्षमता एकदा अवश्य भेट द्या…डीआरडीओच्या दालनाला

आपले संरक्षण दल व त्याच्या वेगवेगळ्या शाखा अखंडपणे देश संरक्षणासाठी सज्ज असतात. मात्र ही सज्जता, सक्षमता आणि आक्रमकता येते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानातून. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (डीआरडीओ) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रयोग …

Read More »

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक शेतकरी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटनप्रसंगी डॉ.बसंत कुमार दास यांचे वक्तव्य

देश धान्य उत्पादनात प्रगतीवर आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ.बसंत कुमार दास यांनी केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्यानिमित्त शेतकरी विज्ञान काँग्रेसचे …

Read More »

जितेंद्र आव्हाड आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात रंगला औरंगजेब वरून कलगीतुरा एकमेकांवर पलटवार करत दिले प्रत्युत्तर

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे विधान केले. त्यावरून भाजपाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सावरकर आणि गोळवलकर गुरूजी यांच्या पुस्तकातील संदर्भ देत …

Read More »

अध्यक्षा चाकणकरांना चित्रा वाघ यांचा खोचक सवाल, आयोग पण बेफाम झालंय का? उर्फी जावेद यांच्यावर सु-मोटो कारवाई करायला वेळ नाही का?

‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. …

Read More »

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या धर्माचे राजकारण करण्याऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कोण गुंतवणूक करेल? !:- नाना पटोले

महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर …

Read More »