Breaking News

उध्दव ठाकरेंच्या सभे आधीच नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटात संजय राऊत सध्या नाशिकच्या दौऱ्यावर

जानेवारी महिन्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहिर सभा होणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. तसेच सध्या नाशिकच्या दौऱ्यावर संजय राऊत आहेत. मात्र तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील ५० पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केला. यापूर्वी संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर असताना १२ माजी नगरसेवकांनी प्रवेश शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता ५० पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटातील गळती रोखण्यात संजय राऊत यांना अपयश येत असल्याचे बोलले जात आहे.

पक्षप्रवेश केल्यानंतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागच्या सहा महिन्यात जे जे निर्णय घेतले, ते सर्वसामान्य माणसांसाठी घेतले. शेतकऱ्यांपासून, युवक, महिला, शिक्षक अशा प्रत्येक वर्गाचे प्रश्न सोडविले. आम्ही बॉम्ब फोडू म्हणाले, पण खोदा पहाड और चुहा भी नही निकला. विरोधकांनी असा आव आणला की, सरकारने खूप मोठा घोटाळा केलाय, पण हाती काहीच लागले नाही. विरोधकांनी आधी माहिती घेतली असती तर त्यांची अशी फसगत झाली नसती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या गटात प्रवेश करत आहेत, याचाच अर्थ आमचे काम त्यांना आवडत आहे. कुणीही कितीही आमच्यावर आरोप केले तरी आम्ही लोकांसाठी काम करत राहू.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले खासदार संजय राऊत हे संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. याआधीही संजय राऊत नाशिकमध्ये येऊन गेले होते. ते गेल्यानंतर १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे जानेवारी महिन्यात सभा घेणार होते, मात्र त्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केलेला दिसत आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेशावरून संजय राऊत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ज्यांनी प्रवेश केला असे तुम्ही त्यातील दोघांची तरी नावे माहित आहेत का? प्रतिप्रश्न त्यांनीच प्रसारमाध्यमांना केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *