Breaking News

संजय राऊत यांचे राणेंना आव्हान, धमक्या देत असाल तर राजवस्त्र काढून या तुरुंगात टाकणार असल्याच्या नारायण राणेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊत यांचा पलटवार

काल शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटातील नेते खासदार संजय राऊत यांना सोडणार नाही. मी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार आहे, असा गर्भित इशारा दिला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणे यांनी वरील विधान केले. नारायण राणेंच्या या इशाऱ्याला आज संजय राऊतांनी जशास तसे उत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, मला बोलायला लावू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची असे सूचक सांगत ईडीची नोटीस आल्यानंतर मी पळून गेलो नव्हतो. माझ्या नादाला लागू नका असा इशाराही दिला.

संजय राऊत हे सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात ते बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली, तर ते ५० वर्षे तुरुंगात जातील. हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्र काढून बाहेर या. मग दाखवतो, असे प्रत्युत्तरही संजय राऊतांनी दिले.

आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच आम्ही पक्ष बदलणारे नाही. त्यांनी धाडसाच्या गोष्टी बोलाव्यात का? मी अद्याप त्यांच्याबाबत काहीच बोललेलो नाही. ते आमचे सहकारी होते. त्यांनी धमक्या देऊ नये. धमक्या देत असाल तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. हे मला तुरुंगात काय टाकणार. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने तुरुंगात गेलो आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

मी तुमच्यासारखा ईडीने बोलवल्यावर पळून गेलेलो नाही. मी शरणागती पत्करलेली नाही. आम्ही नामर्द नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झाले आहात का? कोण काय बोलतंय तसेच प्रत्येकाचे वक्तव्य आम्ही सरन्यायाधीशांना पाठवत आहोत. नारायण राणे यांची आर्थिक प्रकरणं काढली तर ते ५० वर्षे बाहेर येणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *