Breaking News

जितेंद्र आव्हाड आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात रंगला औरंगजेब वरून कलगीतुरा एकमेकांवर पलटवार करत दिले प्रत्युत्तर

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे विधान केले. त्यावरून भाजपाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सावरकर आणि गोळवलकर गुरूजी यांच्या पुस्तकातील संदर्भ देत भाजपावर पलटवार केला. मात्र बोलताना त्यांनी औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपाने आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली असतानाच औरंगजेब यांचा उल्लेख औरंगजेबजी असा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत केला. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळे आणि भाजपावर पलटवार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि बावनकुळे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे चित्र दिसले.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ क्लिप आणि चंद्रपूर येथील दर्ग्यातील फोटो ट्विट करुन जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळे यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आक्रमक प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर प्रतिआव्हान दिले. जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापुर्वी ट्विट करत म्हटले की, मी कधीच कुणावर वैयक्तिक कंबरे खाली वार करत नाही कुणाचे नाव घेऊन टीका करत नाही पण माझ्यावर हल्ला केल्यास मला प्रतिउत्तर द्यावे लागेल. तेव्हा एकमेकानवर वैयक्तिक हल्ला करू नका असे आव्हान दिले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपुर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. यात एका हिंदी पत्रकारांने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केला होता. त्यांचा हा व्हिडिओ ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना चिमटा काढला होता. या टीकेला उत्तर देताना आज वसई-विरार येथे पुन्हा पत्रकार परिषद घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. मी जितेंद्र आव्हाड यांच्या मनातच औरंगजेबजी आहेत, असा उपरोधिक टोला लगावला.

आव्हाड यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला औरंगजेबजी असा उल्लेख जितेंद्र आव्हाड हे फक्त चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडिओ ट्विट करुनच थांबले नाहीत तर त्यांनी भापजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एका दर्ग्यात फुले वाहताना दिसत आहेत. मात्र जितेंद्र आव्हाडांनी या फोटोला कॅप्शन दिले की, औरंगजेबजींच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी, या ट्विटनंतर व्यथित झालेल्या बावनकुळे यांनी इतका ‘नीचपणा’ कसा काय करता, असा प्रश्न उपस्थित केला. याच ट्विटला आता पुन्हा जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.

पवित्र दर्ग्याचं दर्शन घेतानाची तुलना तुम्ही औरंगजेबाच्या कबरीशी केली. आम्ही धर्माच्या विरुद्ध असतो, तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळात अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं नसतं. धर्म पवित्रच असतो. आमचा विरोध दहशतवादी विचारसरणीला आहे. तुम्ही मुस्लीम समाजाचा, त्या भावनांचा अनादर केला आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *