Breaking News

अध्यक्षा चाकणकरांना चित्रा वाघ यांचा खोचक सवाल, आयोग पण बेफाम झालंय का? उर्फी जावेद यांच्यावर सु-मोटो कारवाई करायला वेळ नाही का?

‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?, असा सवाल चित्रा वाघ यांना विचारला होता.

यावरून रुपाली चाकणकर यांनी पलटवार केला होता. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कुणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला, तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

यावरून आता चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र सोडत म्हणाल्या, आयोगाचं काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारु वाटला नाही. कारण, त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. मग, वेळ कशासाठी घालवायचा आहे. एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाही. यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर केली.

उर्फीबरोबर महिला आयोग सुद्धा बेफाम झालं आहे का? ट्वीटरवर आलेल्या बातमीची दखल घेऊन महिला आयोगाने वेब सीरीजच्या अभिनेत्री आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली होती. या वेब सीरीजच्या पोस्टरमुळे धुम्रपानाचं समर्थन आणि अंगप्रदर्शन होत असल्याने कारवाई करण्यात आली. मग येथे तर लाईव्ह शो सुरु आहे. ट्वीटरच्या बातमीची दखल घेणारं महिला आयोग मुंबईच्या रस्त्यावरील चाललेल्या नंगानाचची दखल घेऊ शकत नाही का?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *