Breaking News

एनआयटी भूखंडप्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले, एकनाथ शिंदेला कोण कशाला देईल ३५० कोटी रू. विरोधकांच्या आरोपांवर दिले उत्तर

नागपूर येथील एनआयटीच्या जमिनी न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जमिन घोटाळ्याचे आरोप सुरु झाले. यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनीही वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर आज विधान परिषद आणि विधानसभेत यासंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. तर विधान परिषदेचे कामकाज बंद पाडण्यात विरोधकांना यश आले. या जमिन घोटाळ्याचा मुद्दा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी विशेष पोलिस पथक स्थापणार लव्ह जिहाद कायदा आणण्यासंदर्भातही सरकारची मानसिकता

मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा आणण्याची मागणी भाजपाच्या विविध आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु असून आज विधानसभेत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी श्रध्दा वालकर हिच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अशा हत्या रोखण्यासाठी लव्ह जिहाद …

Read More »

नागपूर येथील विधिमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या तान्ह्या बाळासोबत विधानभवनात आल्यानंतर कक्षाची सुरुवात

नागपूर येथील विधिमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सौ. अहिरे यांच्याच हस्ते …

Read More »

अजित पवारांची मागणी, कोयता गँग’ला मोक्का लावा, तडीपार करा, दहशत मोडून काढा 'कोयता गँग'मधला अल्पवयीन मुलांचा समावेश गंभीर मुद्दा

पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते, राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता त्याच भाषेत उत्तर… हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी सभागृहात केला उपस्थित...

सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले. यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे राजीनामा द्या ईडी सरकारविरोधात मविआची विधानभवनच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरातील १०० कोटी रुपये किंमतीचा भूखंड एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातला असून न्यायालयानेही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक मिनीटही खूर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, ५५०० आशा वर्कर्सची भरती आणि औषध खरेदीची चौकशी करणार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कांदिवली येथी शताब्दी रूग्णालयाच्या औषध खरेदी चुकीच्या पध्दतीने झाली आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या औषध प्रकरणांची चौकशी करण्यात येईल असे सांगत मुंबईत ५५०० आशा वर्करची भरती करणार …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवारांना, आम्ही तुमच्याकडूनच शिकलो… निधी वाटप आणि कामाच्या स्थगितीवरून अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निधी वाटपाला आणि सुरु झालेल्या कामांना स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्यापेक्षा जास्तवेळा निवडूण आलात. आम्ही तुमच्यापेक्षा कमी वेळा …

Read More »

अजित पवार म्हणाले फडणवीसांना, आम्ही अनेकांची सरकारे पाह्यली पण…. निधी वाटपावरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक आमने सामने

आज विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सरकारने स्थगिती दिलेली कामे पुन्हा सुरू करा, याप्रश्नी चर्चा करा अशी मागणही त्यांनी यावेळी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी औचित्याचा मुद्दाद्वारे अजित पवार म्हणाले, …

Read More »

न्यायालयाचा सवाल तर जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंवर आरोप नागपूरातील जमिन वाटपप्रकरणावरून एकनाथ शिंदे संशयाच्या भोवऱ्यात

नागपूर इप्रूव्हमेंट ट्रस्टची (NIT) जमीन १६ जणांना भाडेतत्त्वावर देण्याचे निर्देश तत्कालिन नगरविकास मंत्र एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भूखंडाचे वाटप झालेच कसे? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही …

Read More »