Breaking News

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, ५५०० आशा वर्कर्सची भरती आणि औषध खरेदीची चौकशी करणार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कांदिवली येथी शताब्दी रूग्णालयाच्या औषध खरेदी चुकीच्या पध्दतीने झाली आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या औषध प्रकरणांची चौकशी करण्यात येईल असे सांगत मुंबईत ५५०० आशा वर्करची भरती करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. मुंबई कांदिवली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण महापालिका रुग्णालयातील सोई सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता.

यावर बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी या रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार का?  चुकीची औषध खरेदी व औषध दिरंगाई झाली त्याची चौकशी करणार का?  असे प्रश्न उपस्थित केले.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे मान्य करुन, रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच आमदार अँड आशिष शेलार यांनी केलेल्या सूचने प्रमाणे ५००० स्वच्छता दूत जसे नियुक्त करण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे ५५०० आशा वर्कर्सची भरती करण्यात येईल अशी घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली.

या रुग्णालयाबाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली तीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.

दरम्यान, पश्चिम उपनगरातील सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिकेने ताब्यात घ्यावे अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली. ती मान्य करीत याबाबत महापालिकेला सूचना करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेत आमदार पराग आळवणी, योगेश सागर  सहभागी झाले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *