Breaking News

देश सोडायचा असेल तर आयकर भरणे आता बंधनकारक अन्यथा १० लाखाचा दंड भरावा लागणार

वित्त विधेयक, २०२४ ने अनिवार्य केले आहे की भारतात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला देश सोडण्यासाठी आयकर मंजुरी प्रमाणपत्र आवश्यक असेल. विधेयकाच्या कलम ७१ मध्ये कर मंजुरी प्रमाणपत्रांशी संबंधित आयकर कायद्याच्या कलम २३० मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. ही दुरुस्ती १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होईल. कलम असे वाचते, “उक्त कलमाच्या …

Read More »

अर्थसंकल्पानंतर अॅपलने फोन किंमतीत केली कपात फोन आणि चार्जरवरील करात केली घट

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अॅपलने त्यांच्या फोनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपल Apple ने नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर आपल्या आयफोन iPhone लाइनअपमधील किंमती कमी केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयात केलेल्या मोबाईल फोन आणि घटकांवरील मूलभूत सीमाशुल्क (BCD) २०% वरून १५% पर्यंत …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, थर्ड पार्टी विम्यासाठी पीयुसी प्रमाणपत्राची गरज नाही वाहनचालक-मालकांना न्यायालयाने दिला दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने १० ऑगस्ट २०१७ च्या आदेशाद्वारे लागू केलेली अट काढून टाकली होती, ज्यात वाहनांसाठी थर्ड-पार्टी इन्शुरन्स मिळविण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाखाली (PUC) प्रमाणपत्र आवश्यक आहे. न्यायमूर्ती एएस ओका आणि एजी मसिह यांच्या खंडपीठाने जनरल इन्शुरन्स कौन्सिलने दाखल केलेल्या अर्जाला अनुमती दिली, ज्यात २०१७ च्या आदेशाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारताचे …

Read More »

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी शिवसेनेच्या निष्ठावान परिवाराकडून अनोखी भेट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार पुणेकरांवर भयानक संकट, कपडे आणि ब्लँकेटची मदत करा

पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. लोकांचे संसार उघड्यावर आले आहे. नागिरकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अजूनही वीज पूरवठा पूर्ववत झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. येथील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. ते …

Read More »

नारायण राणे यांचा टोला… विरोधकांची टीका अज्ञानातून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा थांगपत्ताच त्यांना नसल्याने राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहे. त्यांनी अर्थसंकल्पाबाबतचे तुटपुंजे ज्ञान पाजळू …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शरदचंद्र पवार गटाकडून ओबीसी महिला कार्ड काँग्रेससोबत विधानसभा मतदारसंघ अदलाबदली करणार

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या समाधानकारक यशानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेसाठी आपला टक्का वाढविण्यासाठी व्यूहरचना केलेली आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून ओबीसी आणि महिला कार्ड त्यांच्याकडून वापरले जाण्याची शक्यता आहे . लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी …

Read More »

विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत काँग्रेसची १० सदस्यीय समिती स्थापन महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करणार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चेला महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने १० सदस्यांची समिती स्थापन केली. त्यापैकी ३ सदस्य मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. या समितीचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला इशारा, दहशतवाद्यांचे नापाक इरादे कधीही… अग्निपथ योजनेवरून काँग्रेसवरही सोडले टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै रोजी जम्मू-काश्मीरमधील प्रॉक्सी युद्धाला पाकिस्तानचा पाठिंबा जाहीर केला आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले. जम्मू भागात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाकिस्तानने भूतकाळात केलेल्या सर्व नापाक प्रयत्नांमध्ये …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्यांची मदत घ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

पुणे शहर आणि परिसरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महानगर पालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »