Breaking News

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचे संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त एकूण ४५० मतदान केंद्रे राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. अशा सर्व युवा कर्मचाऱ्यांना …

Read More »

‘महायुती’ च्या पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर यांचा शरद पवारांवर आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी …

Read More »

अखेर नारायण राणे यांना भाजपाने केली उमेदवारी जाहिर

राज्यातील लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात सर्वच राजकिय पक्षांकडून आस्ते कदम टाकण्यात येत आहे. भाजपाकडून तर त्यांच्या विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेच्या खासदारांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यासाठीही आस्ते कदम ठेवले जात आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांनाही अशाच पध्दतीने अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहिर करण्यात आली. अगदी त्या पध्दतीने आणि …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डी सुब्बाराव म्हणाले, भारत अजूनही गरिब…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२९ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतरही, भारत अजूनही गरीब देश असू शकतो आणि त्यामुळे उत्सव साजरा करण्याचे कोणतेही कारण नाही, अशा कानपिचक्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सध्याच्या मोदी सरकारला दिल्या. डी सुब्बाराव एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते, जिथे त्यांनी सौदी …

Read More »

देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढतेय, १७ वृध्द एकट्या भारतात वृध्दाश्रमांची संख्याही वाढतेय

एका अहवालानुसार, भारत, सध्या सर्वात तरुण देशांपैकी एक असून, २०५० पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येपैकी १७ टक्के एकट्या भारतात लोकसंख्या राहण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म, CBRE ने भारतातील वरिष्ठ नागरिकांच्या काळजीच्या भविष्यावरील आपल्या अहवालात म्हटले आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी “चांदीची अर्थव्यवस्था” अर्थात पांढऱ्या केसांची अर्थव्यवस्था आहे. …

Read More »

अंबुजा सिमेंटमधील गौतम अदानी यांची हिस्सेदारी ७० टक्क्यावर २० हजार कोटींची गुंतवणूक झाली

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपनीने अंबुजा सिमेंटमध्ये अतिरिक्त ८,३३९ कोटी रुपये गुंतवले आणि सिमेंट निर्मात्याच्या उत्पादन क्षमतेला मदत करण्यासाठी कंपनीतील हिस्सा ७०.३ टक्क्यांवर वाढवला. अदानी कंपनीने यापूर्वी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी कंपनीमध्ये ५,००० कोटी रुपये आणि २८ मार्च २०२४ रोजी ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. नवीनतम गुंतवणुकीसह, त्यांनी २०,००० …

Read More »

१०५ लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्राथमिकता कोणत्या मुद्यांना लोकनीती प्री-पोल सर्व्हेत दिली कारणे

मागील महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. त्यावेळी देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघामध्ये सात टप्प्यात मतदान घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केले. यातील पहिल्या टप्प्यात देशातील १०५ या सर्वात मोठ्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावला. तसेच या १०५ मतदारसंघातील उमेदवारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १९ एप्रिल रोजी मतदान …

Read More »

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड आणि बारामतीचे मतदान होणार असून उद्या या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, मुस्लिम महिलांच्या ट्रस्टची जमिन हडपण्याचा डाव…

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टची जमीन हडपण्यामागे आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी डॉ. उंद्रे यांनी …

Read More »